आयपीएलच्या इतिहासात आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सबरोबर (Gujrat Titance) लखनऊ सुपर जायंट्सने एन्ट्री केली. पहिल्या दोन हंगामात लशनऊने प्लेऑफमध्ये जागा पटकावली. पण जेतेपदापासून दोन पावलं दूरच राहिले. आत सतराव्या हंगामाआधी लखनऊने आपल्या कोचिंग स्टाफमध्येच बदल केला आहे. त्यामुळे नव्या हंगामात लखनऊचा चेहरा-मेहरा बदलला आहे. नव्या इराद्याने लखनऊ संघ आयपीएलच्या (IPL 2024) मैदानात उतरणार आहे. गेल्या हंगामात लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण या हंगामात तो खेळण्याची शक्यता आहे.
याबरोबरच, या हंगमात लखनऊने उपकर्णधारही बदलला आहे. तर गेल्या दोन हंगामात ऑलराऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) संघाचा उपकर्णधार होता. पण या हंगामात वेस्टइंडिजचा माजी कर्णधार आणि डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनवर (Nicholas Pooran) ही जबाबदारी सोपवण्यात आला आहे.
आयपीएलच्या नव्या हंगामासाठी लऊनऊने कोचिंग स्टाफमध्ये (Coaching Staff) मोठा बदल केला आहे. गेल्या हंगामात गौतम गंभीर लखनऊ संघाचा मेंटॉर होता. तर अँडी फ्लॉवर मुख्य प्रशिक्षक आणि विजय दाहिया सहाय्यक प्रशिक्षक होते. पण या हंगामात ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर लखनऊचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लूझनर आणि भारताचा माजी खेळाडू एस श्रीराम यांना सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्न मॉर्केलवर गोलंदाजी कोचची धुरा सोपवण्यात आली आहे. तर जॉन्टी ऱ्होडस संघाचा फिल्डिंग कोच आहे. यासोबतच कोचिंग स्टाफमध्ये माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ॲडम व्होजेसची लखनऊ सुपर जायंट्सने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ॲडम व्होजेस हा आयपीएल 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता. तसेच लखनौ संघाने ॲडम वोगेसचे स्वागत केले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी खेळाडूबाबत माहिती दिली. याशिवाय फ्रँचायझीने आपल्या ट्विटर हँडलवर खेळाडूचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.
May this stint be as extraordinary as his Test average 🫡🔥
Adam Voges joins the LSG support staff for #IPL2024 🇦🇺💙 pic.twitter.com/Oim9JtN7rx
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 14, 2024
दरम्यान, ॲडम वोजेस हा 35 वर्षीय असून त्याने त्याच्या संघासाठी एकूण 20 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 61.88 च्या सरासरीने 1485 धावा केल्या आहेत. आपल्या कसोटी कारकिर्दीत या खेळाडूने 5 शतके आणि 4 अर्धशतके केली आहेत. याशिवाय, त्याने 31 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 45.79 च्या सरासरीने 870 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके केली आहेत. आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर या खेळाडूने राजस्थानसाठी एकूण 9 सामने खेळले. या कालावधीत त्याने 45.25 च्या सरासरीने 181 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –