---Advertisement---

WPL 2024 : आरसीबीचा 16 वर्षांचा दुष्काळ संपणार, बाद फेरीत मुंबई आणि बंगळुरु आमनेसामने

---Advertisement---

वुमन्स लीग स्पर्धेचं दुसरं पर्व असून बाद फेरीत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन संघ आहेत. या सामन्यातील विजेत्या संघाचा सामना अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबई इंडियन्सचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. मुंबई इंडियन्सने तीन वेळा तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एकदा विजय मिळवला आहे.

याबरोबरच, या हंगामात पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 7 गडी आणि 29 चेंडू राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभवाचा वचपा काढला होता. तसेच या स्पर्धेत तिसऱ्यांदा आणि बाद फेरीत पहिल्यांदा हे दोन संघ आमनेसामने येत आहेत. यामुळे  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

यामुळे आरसीबीचे चाहते 16 वर्षांपासून आयपीएलमधील विजेतेपदाची वाट पाहत आहेत, मात्र त्यांना अद्याप विजेतेपद मिळवता आलेले नाही. तर WPL 2024 मध्ये, समृती मंधानाला विजेतेपद मिळवण्याची मोठी संधी यावेळेस निर्माण झाली आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2008 पासून आयपीएलमध्ये भाग घेत आहे.

या संघाने तीनदा आयपीएल फायनलही खेळली आहे, पण विजेतेपद मिळवता आलेले नाही. आरसीबीचे चाहते बऱ्याच दिवसांपासून विजेतेपदाची वाट पाहत होते, पण प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच पडते. आता स्मृती मंधानाला यावेळी आरसीबी चाहत्यांच्या अपेक्षांवर  उतरण्याची आणि डब्ल्यूपीएलमध्ये विजेतेपद मिळवून देण्याची संधी असणार आहे.

दरम्यान, RCB ने एलिस पेरीच्या दमदार प्रदर्शनामुळे करो किंवा मरो सामना जिंकत पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या पोहचली होती. तर  पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सने 8 पैकी 5 सामने जिंकून दुसरे स्थान पटकावले होते.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

प्लेइंग इलेव्हन मुंबई इंडियन्स: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिना वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोबाना, रेणुका सिंग.

महत्वाच्या बातम्या – 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---