---Advertisement---

VIDEO: “बुमराहला स्लो-बॉल टाकायला मी शिकवले”, मूळचा पाकिस्तानी असलेल्या गोलंदाजाचा खळबळजनक दावा

On: बुधवार, मार्च 11, 2026 12:05 PM
---Advertisement---

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सर्वाधिक प्रभावी ठरला. यामुळे पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीच्या चर्चा सुरू झाल्या. त्याला स्लो चेंडू टाकायला मी शिकवले असा धक्कादायक दावा पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या झहूर खान याने केला आहे. तो यूएईकडून गोलंदाजी करतो. सध्या त्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

त्या व्हिडिओमध्ये झहूरने म्हटले की त्याने २०१९च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुमराहला त्याच्या बॉलिंग ऍक्शनमध्ये कोणताही बदल न करता स्लो चेंडू कसा टाकायचा हे शिकवले होते. झहूर युएई लेगमध्ये मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर होता आणि तिथेच त्याने बुमराहसोबत त्याच्या बॉलिंग शैलीबाबत चर्चा केली. “बुमराह स्लो चेंडू टाकत होता, मात्र त्यामध्ये सुधारणा करण्यास सांगितले,” असे वक्तव्य झहूरने केले आहे.

“बुमराह आधी हळू चेंडू टाकायचा, मात्र त्याची ऍक्शन साधी होती. अबू धाबीतील एका सामन्यात त्याने ट्रेंट बोल्ट आणि नॅथन-कुल्टर नाईल यांना खूप धावा दिल्या होत्या. त्यावर्षी सप्टेंबरमध्ये आयपीएल सुरु होते आणि यूएईचे तापमान ५० डिग्री सेल्सियस होते. त्यामुळे गरम वातावरणाने रात्री चेंडू खूप ओला होतो आणि तो तुम्ही नीट पकडू शकत नाही,” असे झहूर म्हणाला.

तेव्हा मुंबईने मला बोलावले, मी ६ दिवस क्वारंटाइन होतो आणि त्यामुळे सातव्या दिवशी सरावासाठी गेलो. झहीर खान आणि रॉबिन सिंग मला ओळखत होते कारण मी टी१० लीगमध्ये निर्धाव षटक टाकले होते. तेव्हा मी पहिला चेंडू यॉर्कर टाकला आणि पुढचे पाच चेंडू हळूवार टाकले. सरावाच्या वेळी मुंबईसोबत असताना तेथे रोहित शर्मा आणि बुमराहही होते.”

त्या व्हिडिओमध्ये पुढे झहूर म्हणाला, “बुमराहने म्हटले मला पुढच्या सरावात तुम्हाला तुमची ग्रिप सांगावी लागेल. मी म्हणालो, ठीक आहे. जेव्हा सराव आला तेव्हा मी गोलंदाजी करत होतो. शेन बाँड मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच होता. महेला जयवर्धने नेटच्या मागे उभा होता. मी येऊन स्लोअर बाउन्सर चेंडू टाकत होतो आणि फलंदाज बीट होत होते. शेन बाँड म्हणाला, तुमची ग्रिप काय आहे? तुम्ही ऑफ-कटर गोलंदाजी करता का? मी म्हणालो, नाही, तीच ग्रिप आहे.”

“बुमराहशी चर्चा केल्यानंतर त्याच्यासोबत नेटमध्ये सराव केला. तेव्हा त्याने माझ्या गोलंदाजीविषयी काही प्रश्न विचारले. तो एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. म्हणून मला ती गोष्ट खूप आवडली की तो इतका मोठा स्टार आहे आणि तो मला विचारत होता,” असेही झहूर पुढे म्हणाला आहे.

बुमराह टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने ८ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ६.८१ असा सर्वोत्तम राहिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---