अजित आगरकर यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडला गेला होता. भारताने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 4-1 असा विजय मिळवला. एकूण पाच भारतीय खेळाडूंना या मालिकेत कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. यातील दोन खेळाडू असे होते, जे केवळ अजित आगरकर यांच्या इच्छेमुळे देसासाठी कसोटी पदार्पण करू शकले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील यावर्षी खेळली गेलेली कसोटी मालिका नक्कीच खास ठरली. भारताचे मालिकेतील प्रदर्शन चर्चेत राहिलेच. पण भारतीय संघाने एकूण 5 खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी दिल्याने देखील मालिका चर्चेचा विषय ठरली. त्याचसोबत इंग्लंडकडून देखील दोन खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. अशा प्रकारे एकूण 7 खेळाडूंनी या मालिकेतून कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. अजित आगरकर () यांनी खासकरून ध्रुव जुरेल आणि दिवदत्त पडिक्कल यांच्या कसोटी पदार्पणासाठी प्रयत्न केले, असे सांगितले जात आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या माहितीनुसार, “अजित आगरकर यांनी ध्रुव जुरेलचे नाव सुचवले होते. संघ व्यवस्थापनाला या खेळाडूविषयी जास्त विश्वास वाटत नव्हता. कारण तो नवखा होता. एक युवा खेळाडू ज्याच्याकडे रेड बॉल क्रिकेट खेळण्याचा जास्त अनुभव नाहीये, त्याला इंग्लंडविरुद्ध संधी देताना व्यवस्थापन थोडा विचार करत होते. पण अजिक आगरकरांनी सांगितल्यावर त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्याचसोबत आगरकर पडिक्कलला खेळवण्यासाठीही आग्रही होते. जेव्हा पडिक्कलने रणजी ट्रॉफीमध्ये 150 धावा केल्या, तेव्हा आगरकर त्याठिकाणी उपस्थित होते. उंचपूरा खेळाडू इंग्लंडच्या फिरकीपटूंचा चांगल्या पद्धतीने सामना करेल, असे त्यांना वाटत होते.”
ध्रुव जुरेल याने राजकोट कसोटीतून कारकिर्दीची सुरुवात केली, तर पडिक्कलचा पहिला कसोटी सामना धरमशालेत होता. ध्रुव जरेल याने रांची कसोटीत भारतासाठी दोन्ही डावांमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले. 90 आणि 39* धावांची खेळी भारताच्या विजयात महत्वाची ठरली होती. त्याचसोबत पडिक्कलने पहिल्याच कसोटी सामन्यात धरमशालेत 65 धावांची अप्रतिम खेळी केली. (On Ajit Agarkar’s insistence, these two players got a chance to make their Test debut)
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy 2024 । ‘मी यावर्षी सर्वात कमी धावा केल्या’, विजेतेपदानंतर काय म्हणाला कॅप्टन रहाणे
हॉकी महाराष्ट्रची विजयी सलामी, सीनियर राष्ट्रीय महिला हॉकी; ऋतुजा पिसाळचे चार गोल;