आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी फक्त एका आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल 2024 चा पहिला सामना 23 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद सोबत खेळणार आहे. तर संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे.
याबरोबरच, कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर गेल्या हंगामात दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही, परंतु तो पुन्हा एकदा आपल्या फ्रँचायझीसाठी पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर सलामीच्या सामन्यात केकेआरच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये कोण-कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण त्याआधी केकेआरचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
श्रेयस अय्यरला IPL 2023 मध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर डावखुरा फलंदाज नितीश राणा याने संघाची कमान हाती घेतली होती. यामध्ये केकेआरने 14 पैकी 6 सामने जिंकले होते आणि गुणतालिकेत ते 7 व्या स्थानावर राहिले होते. आता पुन्हा एकदा केकेआरचा नियमित कर्णधार संघात पुनरागमन करत आहे. तर आयपीएल 2024 पूर्वी अय्यरनेही फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.
रणजी ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या डावात अय्यरने 95 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. तर केकेआरच्या चाहत्यांना अय्यरने यंदा विजेतेपदाची अपेक्षा आहे. तसेच केकेआरने शेवटचे 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर केकेआरला आतापर्यंत विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे.
याबरोबरच, केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंग सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून रिंकू सिंगने भारताच्या T20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि भरपूर धावा केल्या होत्या. यामुळे केकेआरला त्याच्याकडून या हंगामात चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. तसेच रिंकूशिवाय, गेल्या मोसमात केकेआरचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरनेही चमकदार कामगिरी करत 14 सामन्यांत 404 धावा केल्या होत्या. त्यामुळे केकेआरला यावेळी आयपीएलचे विजेतेपद उंचावायचे असेल, तर त्यांच्या आघाडीच्या फळीशिवाय मधल्या फळीलाही अप्रतिम कामगिरी करावी लागणार आहे.
दरम्यान, IPL 2024 च्या मिनी लिलावात KKR ने 10 खेळाडू खरेदी केले होते. यामध्ये अफगाणिस्तानचा लेगस्पिनर मुजीब रहमान, वेस्ट इंडिजचा शेरफेन रदरफोर्ड आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांचा 24 कोटी 75 लाख रुपयांना त्यांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. यानंतर मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी केकेआरची संभाव्य प्लेइंग 11 – व्यंकटेश अय्यर, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा,आंद्रे रसेल, सुनील नारायण, रमणदीप सिंग,मिचेल स्टार्क, मुजीब रहमान, चेतन साकारिया.
महत्वाच्या बातम्या –