भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाविरुद्ध शानदार खेळी केली. मात्र तो दुर्देवी ठरला. श्रेयसचं 5 धावांनी शतक हुकलं. मात्र श्रेयससाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण श्रेयसला काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात आलं होतं. मात्र आता रणजी ट्रॉफी फायनलनंतर बीसीसीआय बॅकफुटवर आली आहे.
एका रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय पुन्हा एकदा श्रेयस अय्यर याच्या वार्षिक कराराबाबत फेरविचार करु शकते. रेवस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, मुंबईसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेत सेमी फायनल आणि फायनलमध्ये खेळल्यानंतर बीसीसीआय श्रेयसचा वार्षिक करारत समावेश करु शकते. बीसीसीआयने फेब्रुवारी महिन्यात वार्षिक कराराची यादी जाहीर केली होती. त्यामधून श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोघांना वगळलं होतं.
Champions! Congratulations to our entire team, support staff and our fans – this is for all the collective effort put in and sticking by each other through thick and thin 🤗 Special mention to @dhawal_kulkarni on a glorious career, what a way to sign off! 👏🏆 pic.twitter.com/QLNdYFCqml
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 14, 2024
दरम्यान, श्रेयसने रणजी ट्रॉफीत मुंबईसाठी सेमी फायनल आणि फायनल सामन्यात खेळला. श्रेयसला अंतिम सामन्यात बॅटिंग दरम्यान पाठदुखीचा त्रास पुन्हा जाणवला. त्यामुळे श्रेयस पाचव्या दिवशी फिल्डिंगसाठी मैदानात येऊ शकला नाही. त्यामुळे बीसीसीआयला श्रेयस तेव्हा खरं बोलत होता, अशी खात्री बीसीसीआयला पटली असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बीसीसीआय श्रेयसचा वार्षिक करारबाबतचा निर्णय बदलू शकते, असं म्हटलं जातं आहे.
याबरोबरच, श्रेयस अय्यरला IPL 2023 मध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर डावखुरा फलंदाज नितीश राणा याने संघाची कमान हाती घेतली होती. यामध्ये केकेआरने 14 पैकी 6 सामने जिंकले होते आणि गुणतालिकेत ते 7 व्या स्थानावर राहिले होते. आता पुन्हा एकदा केकेआरचा नियमित कर्णधार संघात पुनरागमन करत आहे. तर आयपीएल 2024 पूर्वी अय्यरनेही फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. रणजी ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या डावात अय्यरने 95 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. तर केकेआरच्या चाहत्यांना अय्यरने यंदा विजेतेपदाची अपेक्षा आहे.
आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी केकेआरची संभाव्य प्लेइंग 11 – व्यंकटेश अय्यर, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा,आंद्रे रसेल, सुनील नारायण, रमणदीप सिंग,मिचेल स्टार्क, मुजीब रहमान, चेतन साकारिया.
आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी केकेआरच्या सामन्यांचे वेळापत्रक –
23 मार्च, केकेआर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
29 मार्च, आरसीबी विरुद्ध केकेआर
3 एप्रिल, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध केकेआर
महत्वाच्या बातम्या –