---Advertisement---

धोनी Vs विराट! घ्या जाणून RCBच्या पहिल्याच सामन्यांचे तिकीट कसे बुक करायचे

RCB-Team
---Advertisement---

सध्या आयपीएल स्पर्धेचा जोर आता सगळीक़डे हळूहळू चढू लागला आहे. तर आयपीएलचा 17 वा हंगाम हा 22 मार्चपासून सुरू होत आहे. बीसीसीआयने पहिल्या काही सामन्यांचेच शेड्युल जाहीर केलं असून यंदाच्या हंगामाची सुरूवात ही गतविजेत्या आणि उपविजेत्यांच्या सामन्याने होणार नाही. तर आयपीएलचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

याबरोबरच आयपीएलचा पहिला सामना हा चेन्नईच्या एमएम चिदंबरम स्टेडियमवरून होणार आहे. तसेच या सामन्याला विराट विरूद्ध धोनी असं देखील पाहिलं जात आहे. तर फाफ ड्युप्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी आणि धोनीच्या नेतृत्वाखाली दोन्हीं संघ मैदानात उतरणार आहेत.

अशातच ड्युप्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाचा प्रयत्न चांगली सुरवात करणे असणार आहे. तर गेल्या हंगामात त्यांना प्ले ऑफसाठी पात्र होता आलं नव्हतं. यंदाच्या हंगामातील पहिल्या सत्रात आरसीबी 5 सामने खेळणार आहे. त्यांचे तीन सामने हे होम ग्राऊंड चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी आरसीबीचे होम ग्राऊंडवरील तीन सामने हे पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरूद्ध होणार आहेत. मात्र ही तिकीटे अजून विक्रीसाठी उपलब्ध झालेली नाहीत. तसेच आरसीबीच्या सामन्यांच्या तिकीटाची किंमत ही 3300 ते 9680 रूपयांपर्यंत असणार आहे.

घ्या जाणून आरसीबीच्या सामन्यांची तिकीटे कशी करायची बुक 

तिकीट बूक करण्यासाठीची लिंक : https://in.bookmyshow.com/sports/chennai-super-kings-vs-royal-challengers-bangalore

25 मार्च – RCB Vs PBKS – सामन्याची वेळ सायंकाळी 7.30

29 मार्च – RCB Vs KKR – सामन्याची वेळ सायंकाळी 7.30

2 एप्रिल – RCB Vs LSG – सामन्याची वेळ सायंकाळी 7.30

6 एप्रिल – RCB Vs RR – सामन्याची वेळ सायंकाळी 7.30

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---