---Advertisement---

IPL 2024 पूर्वी ऋषभ पंत नेट्समध्ये करतोय हेलिकॉप्टर शॉटचा सराव, पाहा Viral Video

---Advertisement---

धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतच्या पुनरागमनाची क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. पंत आयपीएल 2024 मध्ये मैदानात परतणार आहे. यासाठी तो जोरदार सरावाला लागला आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर पंत बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर होता. आता मात्र त्यानं दिल्ली कॅपिटल्ससाठी सरावाला सुरुवात केली आहे. तो नेट्समध्ये घाम गाळताना दिसतोय.

ऋषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो सरावादरम्यान अतिशय सुंदर शॉट्स खेळताना दिसला. पंतनं नेट्समध्ये जवळपास हेलिकॉप्टरसारखा शॉट खेळला. पंतचा हा शॉट बघून त्याची तयारी किती उत्कृष्ट आहे याचा अंदाज येतो. पंत अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असला तरी त्याचा हा शॉट पाहता तो सतत क्रिकेट खेळत असल्याचं दिसून येतं.

 

आम्ही तुम्हाला सांगतो, आयपीएल 2024 शुक्रवार, 22 मार्चपासून सुरू होणार आहे. ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचा स्पर्धेतील पहिला सामना 23 मार्च, शनिवारी चंदीगडमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध खेळला जाईल.

डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. अपघातामुळे झालेल्या दुखापतीतून सावरता न आल्यानं तो आयपीएलच्या मागील हंगामाला मुकला होता. पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सनं डेव्हिड वॉर्नरच्या हाती संघाची कमान दिली होती. मात्र वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी अतिशय खराब राहिली. आयपीएल 2023 मध्ये संघ गुणतालिकेत 9 व्या स्थानावर राहिला.

आता ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये कर्णधार म्हणून खेळणार की नाही हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. या स्पर्धेत पंत किती क्षमतेनं खेळू शकतो, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.

ऋषभ पंतनं 21 मे 2022 रोजी दिल्ली कॅपिटल्ससाठी शेवटचा सामना खेळला होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात त्यानं 33 चेंडूंचा सामना करत 39 धावा केल्या होत्या. ऋषभच्या या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या होत्या. मुंबईनं 160 धावांचं लक्ष 5 विकेट्स गमावून गाठलं होतं.

ऋषभ पंतचा आयपीएलमधील एकूण रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 98 सामने खेळले. या कालावधीत त्यानं 2838 धावा केल्या आहेत. पंतनं या काळात 1 शतक आणि 15 अर्धशतकंही झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, 4 कोटी रुपयांना खरेदी केलेला स्टार फलंदाज IPL मधून बाहेर

दिल्ली कॅपिटल्समध्ये लुंगी एनगिडीच्या जागी ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची एन्ट्री, 29 चेंडूत ठोकलं होतं शतक!

ऋषभ पंत तब्बल 662 दिवसांनंतर दिसला दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीत, IPL 2024 साठी प्रॅक्टिस सुरू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---