भारतीय कसोटी संघात बरेच महान खेळाडू होऊन गेले. भारतीय संघात सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) सचिन तेंडुलकर, (Sachin Tendulkar) राहुल द्रविड, (Rahul Dravid) अनिल कुंबळे (Anil Kumble) असे महान माजी क्रिकेटर होऊन गेले आहेत. यांनी संघात आपली एक वेगळी ओळख बनवली. भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केलं, त्यामुळे भारतीय संघ आता शिखरावर आहे. यात अष्टपैलू खेळाडूंचं सुद्धा मोलाचं योगदान आहे. कारण त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी करून महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये सगळेच चांगलं प्रदर्शन करू शकले नाही, पण काही खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. काही खेळाडू कमी वेळात चांगलं प्रदर्शन देऊ शकले नाही, पण जे बऱ्याच काळापासून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. जाणून घेऊया अशा ३ अष्टपैलू खेळाडूंबद्दल
भारतीय संघाचे कसोटीमधले अष्टपैलू खेळाडू
१. विनू मांकड (Vinoo Mankad)
विनू मांकड अष्टपैलू खेळाडू उजव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स गोलंदाज होते. कसोटी संघात काही नव्हतं, तेव्हा विनू मांकड संघाचा आधारस्तंभ होते. पंकज रॉयसह त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४१३ धावांची केलेल्या भागीदारीची आज ही विक्रमात नोंद आहे. त्यांच्या नावावर एकाच सामन्यात शतक आणि ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम आहे. त्यांनी खेळलेल्या ४४ कसोटी सामन्यांत २१०९ धावा केल्या, तसेच १६२ विकेट्स घेतल्या.
२. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)
संघाला गरज असताना आर अश्विनने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमधून सुद्धा योगदान दिलं आहे. त्याच्या गोलंदाजीबद्दल, तर सगळेच जाणतात. त्याने स्वतःला अष्टपैलू खेळाडू, म्हणून संघाच्या विजयात त्याचं नेहमी योगदान असतं. अश्विनने ८१ कसोटी सामन्यांत ५ शतकांसह २७५५ धावा केल्या आहेत. आणि त्याने ४२७ विकेट्स आहेत.
३. कपिल देव (Kapil Dev)
भारताचा महान अष्टपैलू खेळाडू म्हणून कपिल देव यांना ओळखलं जातं. कसोटीमध्ये भारतीय संघाला उत्तुंग यश प्राप्त करून देण्यात कपिल देव यांचं मोलाचं योगदान आहे. कपिल देव यांनी १३१ कसोटी सामन्यांत ५२४८ धावा केल्या आणि ४३४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी कारकिर्दीत ८ शतकं साजरी केली. ते भारताच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये नेहमी अव्वल स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ! माजी क्रिकेटपटूला झाली अटक; जामीनही नामंजूर
पत्रकार परिषदेत विराटचे ५ मुद्यांवर परखड भाष्य, आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी ‘किंग कोहली’ उपलब्ध
ऍडीलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन जाहीर; मात्र, प्रमुख गोलंदाज संघाबाहेर