क्रिकेट पाहण्याची खरी मजा तेव्हा येते, जेव्हा फलंदाज एका नंतर एक षटकार-चौकार मारायला लागतो. यामुळे सामना जास्त रोमांचक बनत जातो आणि प्रेक्षकांनाही तो कंटाळवाना वाटत नाही. कदाचित अशा ताबडतोब फलंदाजीमुळेच टी२० क्रिकेटला इतकी लोकप्रियता मिळत असावी. कारण, मर्यादीत षटकांच्या या क्रिकेट स्वरुपामध्ये फक्त २० षटके असतात म्हणून फलंदाज मोठ-मोठे शॉट्स मारण्याच्या प्रयत्नात असतात.
अशात क्रिकेटविश्वात असेही काही प्रतिभाशाली फलंदाजी आहेत, ज्यांनी त्यांच्या पदार्पणाच्या टी२० सामन्यात आक्रमक फलंदाजी करत अर्धशतके ठोकली आहेत. जगातील सर्व संघांच्या मिळून ४३ फलंदाजांनी टी२० पदार्पणात ५० किंवा अधिक धावांची खेळी केली आहे.
यातील अशा ३ फलंदाजांविषयी जाणून घेऊया, ज्यांची शतके अतिशय धुव्वांदार होती. 3 Batsman Hit Half Century On T20I Debut
१. डेविड मलान –
इंग्लंडच्या डावखुरा फलंदाज डेविड मलानने २५ जून २०१७ला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी२० पदार्पण केले होते. इग्लंडमधील सोफिया गार्डन स्टेडियमवर खेळताना मलानने ४४ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारासंह ७८ धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा ११७.२७ इतका होता. इग्लंडने तो सामना १९ धावांनी जिंकला होता. शिवाय, मलान त्याच्या दमदार खेळीसाठी सामनावीरही ठरला होता.
मलानने आतापर्यंत १० टी२० सामने खेळत ४६९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
२. डेविड वॉर्नर –
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेविड वॉर्नरला सर्वजण ओळखतात. वॉर्नरने त्याच्या टी२० कारकिर्दीची सुरुवातच ताबडतोब फलंदाजीने केली होती. ११ जानेवारी २००९ला मेलबर्न येथील दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यातून वॉर्नरने टी२०मद्ये पदार्पण केले होते. यावेळी सलामीला फलंदाजी करताना वॉर्नरने ७ चौकार आणि ६ षटकारांसह ४३ चेंडूत दमदार ८९ धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा २०६.९८ इतका होता. ऑस्ट्रेलियाने तो सामना ५२ धावांनी जिंकला होता.
वॉर्नरने आतापर्यंत ७९ टी२० सामन्यात २२०७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे.
३. रिकी पाँटिंग –
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने १७ फेब्रुवारी २००५मध्ये टी२० क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. यावेळी इडन पार्क येथील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ५५ चेंडूत नाबाद ९८ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ८ चौकारांचा आणि ५ षटकारांचा समावेश होता. केवळ २ धावांमुळे त्याचे शतक हुकले होते. तरी, पाँटिंगला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने तो सामना ४४ धावांनी जिंकला होता.
पाँटिंगने त्याच्या टी२० कारकिर्दीत १७ सामन्यात ४०१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग लेख-
संघातील पुर्णवेळ यष्टीरक्षक, ज्यांनी गोलंदाजी करताना घेतल्या आहेत…
बापरे! ४० टी२० सामने खेळून एकही चौकार न मारता आलेले २ भारतीय
२००पेक्षा जास्त वनडे खेळून कधीही एकही चेंडू न टाकलेले ५ क्रिकेटपटू