आपल्या देशाकडून कसोटी सामन्यात खेळताना शतके ठोकण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. जर, पदार्पणाच्या सामन्यातच खेळाडूने शतक केले तर ते सर्वांसाठी अविस्मरणीय ठरते आणि त्या खेळाडूला लवकरच क्रिकेटविश्वात एक नवी ओळख मिळते. त्यातही जर त्या खेळाडूने त्याच्या अंतिम कसोटी सामन्यात शतक ठोकण्याची कामगिरी केली तर, तो जाता-जाता संघात आपली छाप पाडून जातो.
शिवाय असे अनेक खेळाडू असतात जे त्यांच्या कारकिर्दीत कित्येक शतके करतात. पण त्यांना पदार्पणाच्या आणि कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात शतक ठोकण्याचे भाग्य लाभत नाही. तर, काही खेळाडू केवळ पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकतात तर, काही फक्त शेवटच्या सामन्यात.
क्रिकेट विश्वात असे ५ फलंदाज आहे ज्यांनी पदार्पणाच्या व शेवटच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली आहे. ग्रेग चॅपेल, रॅगी डफ, मोहम्मद अझरुद्दीन, विलियम पोनस्फर व एलिस्टर कूक हे ते ५ खेळाडू. या लेखात आपण त्या खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या कसोटी पदार्पणाच्या आणि शेवटच्या सामन्यात शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे.
Greg Chappell, Reggie Duff, Mohammad Azharuddin and William Ponsfor 3 batsman smashed hundred in debut and last test match.
ग्रेग चॅपेल (Greg Chappell) –
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी डिसेंबर १९७०ला इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी पर्थ येथील कसोटी सामन्यात खेळताना त्यांनी पहिल्या डावातच १० चौकारांसह १०८ धावा केल्या होत्या. त्यानंतर १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना त्यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळला. जानेवारी १९८४ला सिडनी येथे आपला अंतिम कसोटी सामना खेळताना त्यांनी पहिल्या डावात १७ चौकारांसह १८२ धावा केल्या होत्या.
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ग्रेग हे भारतीय संघाचे प्रशिक्षक देखील होते. त्यांच्या आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीमधील वादाविषयी बरीच चर्चा रंगली होती.
मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) –
भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी १९८५ला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी कोलकाता येथे झालेल्या सामन्यात त्यांनी १० चौकारांसह ११० धावा केल्या होत्या. त्यानंतर १५ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना त्यांनी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळला. यावेळी २०००साली बेंगलोर येथील अंतिम सामन्यात खेळताना त्यांनी दुसऱ्या डावात १३ चौकारांच्या आणि २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या होत्या.
सर ऍलिस्टर कूक (Alastair Cook) –
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू सर ऍलिस्टर कूक यांनी २००६ साली नागपूर येथील भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी त्यांनी दुसऱ्या डावात १२ चौकारांसह १०४ धावा केल्या होत्या. आपल्या १२ वर्षांच्या कसोटी कारकर्दीतील शेवटचा सामना त्यांनी २०१८ साली खेळला होता. यावेळी लंडन येथे भारताविरुद्धच्या आपल्या अंतिम कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्यांनी १४७ धावा केल्या होत्या. यात त्याच्या १४ चौकारांचा समावेश होता. भारताविरुद्धची त्यांची खेळी उत्कृष्ट होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
करार न केलेल्या खेळाडूंना परदेशी लीग खेळता यावीत म्हणून रैना-इरफानने सुचवले उपाय
रोहित- रैना तयार केली सीएसके- मुंबईची मिळून जबरदस्त ड्रीम ११
चहलने विचारलं असा काही प्रश्न, युवराज म्हणाला; रोहित- रैनाचे गाल पहा