कसोटी क्रिकेट म्हणजे फलंदाजांच्या संयमाची घेतली जाणारी परिक्षा. या प्रकारात फलंदाज कसोटीत मोठे शॉट्स मारण्याऐवजी बचावात्मक खेळी करत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कसोटीत खूप कमी षटकार पाहायला मिळतात. परंतु, जर एखादा फलंदाज एका-नंतर-एक षटकार मारु लागला तर ते त्या फलंदाजांचे धाडसच म्हणावे लागेल.
क्रिकेटमध्ये सलग ३ चेंडूवर ३ षटकार, ३ विकेट्स किंवा असे इतर पराक्रम केले गेले, तर त्याला हॅट्रिक म्हणून संबोधले जाते. पण, त्यापलीकडेही सलग ४ चेंडूत ४ षटकार मारण्याचा कारनामाही क्रिकेटमध्ये केला गेला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाहिले तर, असा कारनामा करणारे फक्त ३ फलंदाज आहेत आणि या फलंदाजांचा क्रिकेट इतिहासात वेगळाच रुतबा आहे.
तर बघूयात, कोण आहेत ते ३ फलंदाज ज्यांनी ४ चेंडूत मारलेत सलग ४ षटकार
कपिल देव (भारत) –
भारताचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांना त्यांच्या तूफान फलंदाजीसाठी ओळखले जात होते. त्यांनी कसोटीमध्ये कित्येकदा तरी वेगवान फलंदाजी करत मोठ्या खेळी केली आहेत. परंतु, १९९०मध्ये कपिल यांनी कसोटीत असा पराक्रम केला, जे खूप कमी फलंदाज करु शकतात. इंग्लंडचा फलंदाज एडी हेमिंग्सच्या एका षटकात कपिल यांनी सलग चेंडूंवर ४ षटकार मारले होते.
या षटकारांची विशेष बाब ही होती की, त्या सामन्यात भारताला इंग्लंडच्या फॉलोऑनपासून वाचण्यासाठी २४ धावांची आवश्यकता होता आणि शेवटची विकेट उरली होती. त्यामुळे कपिल यांच्या ४ षटकारांनी भारताला फॉलोऑनपासून वाचवले. तो डाव कपिल यांच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ डावांमध्ये सामील झाला.
एबी डिविलियर्स (दक्षिण आफ्रिका) –
दक्षिण आफ्रिकाचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सला जगातील खतरनाक फलंदाजांमध्ये गणले जाते. त्याने वनडे आणि टी२०मध्ये अनेकदा तूफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. डिविलियर्सदेखील कसोटीत ४ चेंडूंवर ४ षटकार मारणारा फलंदाज आहे. त्याने हा पराक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००८-०९मध्ये खेळताना केला होता.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अँड्र्यू मॅकडोनाल्डच्या षटकात डिविलियर्सने ४ चेंडूंवर सलग ४ षटकार मारले होते. याच सामन्यात डिविलियर्सने १६३ धावांची तूफानी खेळीदेखील केली होती.
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) –
कसोटीत सलग ४ चेंडूंवर ४ षटकार मारणारा तिसरा फलंदाज हा शाहिद आफ्रिदी आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदीला क्रिकेटविश्वातील धुव्वाधार फलंदाज मानले जाते. २००६मध्ये मायदेशात भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात आफ्रिदीने भारताच्या फिरकीपटू हरभजन सिंगला आपला निशाना बनवले होते. त्याने हरभजनच्या एका षटकातील ४ चेंडूंवर सलग ४ षटकार ठोकले होते. या सामन्यात आफ्रिदीने १०३ धावांची खेळी केली होती.
कसोटीत षटकारांची हॅट्रिक घेणारे भारतीय फलंदाज
कसोटीत सलग ३ चेंडूंवर ३ षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांविषयी बोलायचे झाले तर, यामध्ये ३ फलंदाजांची नावे येतात. एक म्हणजे हिटमॅन रोहित शर्मा (२०१९-२०, दक्षिण आफ्रिका), दूसरा हार्दिक पंड्या (२०१७, श्रीलंका) आणि तिसरा एमएस धोनी (२००६, वेस्ट इंडिज).
ट्रेंडिंग लेख-
अबब! कसोटी डावात ७०० पेक्षा जास्त चेंडू खेळणारे ३ फलंदाज, एक फलंदाजाने खेळलेत ८४७ चेंडू
आयपीएलमध्ये ‘या’ ३ भारतीय दिगग्ज क्रिकेटर्सबरोबर खेळू शकला…
करियरमधील पहिल्याच वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट्स घेणारे ३ गोलंदाज