आतापर्यंत आयपीएलचे १२ हंगाम झाले आणि १३ वे हंगाम १९ सप्टेंबरला सुरु होईल. प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असते की आयपीएलमध्ये आपल्याला संधी मिळावी आणि त्यात आपले कौशल्य दाखवून सर्वांची मने जिंकायची. नवीन खेळाडूंना अधिक चांगले खेळ दाखवतात कारण आयपीएलनंतर त्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळण्याची अपेक्षा असते. सध्या आयपीएलनंतर देशाच्या संघात खेळणार्या खेळाडूंची बरीच मोठी यादी आहे.
अनेक खेळाडू आयपीएलमध्ये शतक ठोकून आपली प्रतिभा दाखविण्याचा प्रयत्न करतात.आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूचा स्वत: चा असा चाहता वर्ग असतो. विराट कोहली, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, एमएस धोनी आणि ख्रिस गेल फलंदाजी यांसारख्या फलंदाजांची फलंदाजी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. बर्याच वेळा खेळाडू त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे खेळ करतात तर कधी अपयशी ठरतात. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बर्याच खेळाडूंनी शतके ठोकली आहेत. काही खेळाडू शतक करण्यात अपयशी ठरले आहेत, परंतु त्यांच्या फलंदाजीतून भरपूर धावा आल्या आहेत. या लेखात अशा तीन फलंदाजांचा उल्लेख आहे ज्यांनी शतक न करता आयपीएलमध्ये ४ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
या ३ फलंदाजांनी आयपीएलमध्ये शतक न करता केल्या ४ हजार धावा
रॉबिन उथप्पा (Robin Uthappa)
रॉबिन उथप्पा कोलकाता नाईट रायडर्सकडून बरीच वर्षे खेळला. या फलंदाजाने आयपीएलमध्ये काही सर्वोत्कृष्ट डाव खेळले आहेत. ७ व्या हंगामात ६६० धावा करणाऱ्या उथप्पाला त्या हंगामात ऑरेंज कॅप देखील मिळाली होती. यावेळी तो आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. आतापर्यंत उथप्पाने १७० सामन्यांत ४४१२ धावा केल्या आहेत. २४ अर्धशतक ठोकणार्या रॉबिन उथप्पाने वैयक्तिक सर्वाधिक ८७ धावा केल्या आहेत. अजूनपर्यंत त्याला एकदाही शतक करता आले नाही.
एमएस धोनी (MS Dhoni)
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीच्या फलंदाजीमध्ये प्रेक्षकांना षटकारांची अपेक्षा असते. आतापर्यंत एमएस धोनीने आयपीएलच्या १९० सामन्यांत ४४३२ धावा केल्या आहेत. २३ वेळा अर्धशतकीय डाव खेळणाऱ्या धोनीने अद्याप एकही शतक केले नाही. त्याची वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या नाबाद ८४ आहे. बहुधा मधल्या फळीत फलंदाजीला आल्यामुळे त्याला शतक करता आले नसेल.
शिखर धवन (Shikhar Dhawan)
या फलंदाजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकले आहेत. शिखर धवनने १५९ सामन्यात ४५७९ धावा केल्या आहेत. त्याने ३७ वेळा अर्धशतक ठोकले असून त्याने एकही शतक ठोकले नाही. नाबाद ९७ अशी त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये त्याने ५२४ चौकार ठोकले आहेत जे इतर सर्व फलंदाजांपेक्षा जास्त आहेत. प्रेक्षकही यावेळी त्याच्या शतकाची वाट पाहतील. या वेळी तो दिल्ली संघाकडून खेळताना दिसेल.
ट्रेंडिंग लेख –
दोन वेळा स्वप्न भंगल्यानंतर तिसऱ्या वेळी इंग्लंडला विश्वचषकाची भेट देणाऱ्या ‘आयरिश क्रिकेटरची’ गोष्ट
हे ५ खेळाडू आहेत आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ऑरेंज कॅपचे प्रमुख दावेदार
जायचे होते सैन्यात पण गाजवतोय क्रिकेटचे मैदान
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनला गोलंदाजीचे धडे देताना पाहिलंय का? पाहा व्हिडिओ
लाडकी लेक थांबलीय वडील धोनीचा स्केच घेऊन, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
खुशखबर: कोरोनावर मात करून ‘हा’ खेळाडू झाला सीएसकेच्या ताफ्यात दाखल