नवी दिल्ली। सर्व आयपीएल फ्रँचायझी आणि त्यांचे खेळाडू स्पर्धेसाठी जोरदार सराव करताना दिसत आहेत. यावेळी, सिनीयर खेळाडू त्यांच्या संघातील युवा खेळाडूंना असा सल्ला देत आहेत, जो येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल.
असेच एक उदाहरण भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सर्वांसमोर मांडले आहे. ज्यात तो आपल्या संघातील एका युवा गोलंदाजाला सल्ला देतो आणि पुढच्याच चेंडूवर गोलंदाज चांगली गोलंदाजी करायला सुरुवात करतो.
खरं तर कर्णधार रोहितचा सराव करण्याचा एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटवर सराव करताना, दिग्विजय सतत चुकीची गोलंदाजी करत होता आणि त्यानंतर वाइड बॉल टाकला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा गोंधळून गेला. त्याने विचारले की काय अडचण आहे? मग दिग्विजय म्हणाला की, मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतर रोहितने त्याला गुडलेथ बॉलिंगवर आपले लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आणि त्याने तसे केले.
गतविजेती मुंबई इंडियन्स आयपीएल २०२० च्या पहिल्या सामन्यात १९ सप्टेंबर रोजी माहीच्या महारथींशी म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. हा सामना आबुधाबी येथे खेळला जाईल. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करावी लागेल. कारण मुंबई इंडियन्स गतविजेती चॅम्पियन असून मुंबईने अद्याप युएईमध्ये एकही सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मा संघाचे रेकॉर्ड सुधारण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलमध्ये एका गोलंदाजाला ४ नको ५ षटकांची द्या परवानगी, पहा कुणी केलीय ही मागणी
-दुबईत आयपीएलला गेलेला भारतीय खेळाडू आहे नाराज, म्हणाला…
-धोनी आणि कैफने मिळून फलंदाजला रनआऊट केलेला भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिलाय का?
ट्रेंडिंग लेख-
-विराट-डिविलियर्सच्या खांद्याला खांदा लावत हे २ धुरंदर यंदा आरसीबीला बनवणार विजेता
-घरात टीव्ही नसल्याने गल्लीत पान टपरीवर क्रिकेट पाहणारा मुलगा बनला टीम इंडियाचा कर्णधार..





