---Advertisement---

धोनी आणि कैफने मिळून फलंदाजला रनआऊट केलेला भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिलाय का?

On: गुरूवार, सप्टेंबर 10, 2020 4:55 PM
---Advertisement---

मुंबई । एमएस धोनी हा जगातील एक महान यष्टीरक्षक आहे. यष्टीमागे थ‍ांबून विजेच्या वेगाप्रमाणे चपळाई दाखवत त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. धोनीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू असताना यष्टीरक्षणाचे उत्तम तंत्र नव्हते, परंतु वेळ आणि अनुभवाने तो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक ठरला. यष्टीच्या मागे थांबत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 829 विकेट्स घेतल्या.

यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून त्यांचे पराक्रम क्रिकेटच्या इतिहासात सर्वश्रुत आहेत, परंतु भारताचा माजी फलंदाज आणि धोनीचा माजी साथीदार मोहम्मद कैफचा असा विश्वास आहे की, भारताचा माजी कर्णधारही एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला असता.  कैफ जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.  नुकताच त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक जुना धावचीत केलेला व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामन्याचा आहे, ज्यामध्ये कैफ आणि धोनीने एकत्रितपणे धावचीत केले होते. धोनीबरोबर ड्रेसिंग रूममध्ये कैफने बराच वेळ घालवला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, फलंदाज कव्हर्सच्या दिशेने एकच फटका मारण्याचा प्रयत्न करीत आहे, धोनी तातडीने चेंडू पकडण्यासाठी धावत होता.

व्हिडिओमध्ये कैफ शॉर्ट लेगमध्ये मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. त्यांनंतर कैफ विकेटकीपरची जागा घेत धोनीने वेगाने फेकलेला चेंडू तो पकडतो. दोन्ही खेळाडू एकत्रपणे फलंदाजास धावचीत करतात. हा व्हिडिओ शेअर करताना कैफने लिहिले की, “मला वाटते की मैदानात कुठेही उभे राहिला असता तर एमएसडी एक चांगला क्षेत्ररक्षक झाला असता आणि कदाचित मी ही एक चांगला यष्टीरक्षक झालो असतो.”

एमएस धोनीने यावर्षी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला होता. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 वनडेत 10 हजार 773 धावा, 90 कसोटीत 4, हजार 876 धावा आणि 98 टी -20 सामन्यात 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वात 2007 चा टी -20  विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स करंडक अशी विजेतेपदे भारताने जिंकली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

हा २३ वर्षाचा फिरकीपटू एमएस धोनीलाही ठोकु देत नाही षटकार

दिग्गजांशी तुलना होत असलेला हा खेळाडू प्रेमाच्या खेळपट्टीवरही ठोकतोय चौकार आणि षटकार?

हिटमॅन रोहित शर्मा चेंडू फक्त स्टेडियमबाहेरच पाठवत नाही, तर चालत्या बसवर मारतोय, पहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख –

भारताच्या १९ वर्षांखालील संघातील हे ३ खेळाडू आयपीएलसाठी सज्ज, अंतिम अकरामध्ये स्थान निश्चित

असे ४ क्रिकेटर जे परदेशात जन्मले पण खेळले भारतासाठी क्रिकेट

…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---