मुंबई इंडियन्सचा संघ सध्या आबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर सराव करत आहे. नवीन हंगामासाठी हा संघ खूपच परिश्रम घेत आहे. त्यांचा पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.
नेट प्रॅक्टिस दरम्यान कर्णधार रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. आणि त्याला पाहून असे दिसते आहे की, कोव्हिड- १९ महामारीच्या मोठ्या विश्रांतीनंतर त्याने चांगली लय मिळवलेली आहे.
चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो जबरदस्त षटकार मारताना दिसत आहे. या षटकाराची लांबी ९५ मीटर असल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा मुंबईचा संघ आबुधाबीमध्ये सराव करत होता. या व्हिडिओमध्ये त्याने किती आरामात षटकार मारला हे दिसते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो चेंडू सरळ रस्त्यावरून जात असलेल्या चालत्या बसच्या छतावर पडतो. हा व्हिडिओ शेअर करताना मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना त्याला कॅप्शन दिले की, “फलंदाज षटकार ठोकतात, दिग्गज स्टेडियम बाहेर चेंडू पाठवतात आणि हिटमॅन षटकारही ठोकतो, चेंडू स्टेडियम बाहेjही पाठवतो आणि चालत्या बसवरही चेंडू मारतो.”
???? Batsmen smash sixes
???? Legends clear the stadium
???? Hitman smashes a six + clears the stadium + hits a moving ????#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/L3Ow1TaDnE— Mumbai Indians (@mipaltan) September 9, 2020
आता रोहित शर्मा ज्या लयीमध्ये दिसत आहे. यावरून असं दिसतंय की त्याने विश्रांती अगोदर ज्या फॉर्ममध्ये खेळणं थांबवलं होतं, त्याच फॉर्ममध्ये तो आता खेळताना दिसला. दुखापतीमुळे रोहितला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. परंतु त्याआधी तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पुनरागमन करण्यास सज्ज झाला होता. परंतु कोरोना महामारीमुळे ही वनडे मालिका रद्द झाली होती.
दुखापतीनंतर रोहित आता आयपीएलच्या १३ व्या हंगामात पुनरागमन करणार असून तो मुंबईचे नेतृत्व करताना दिसेल. रोहितशिवाय मुंबई संघात क्विंटन डी कॉक, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्डसारखे फलंदाज आहेत. त्याचबरोबर या संघात जसप्रीत बुमराह, ट्रेंट बाउल्ट, मिशेल मॅक्लेनघन आणि राहुल चहर असे घातक गोलंदाज आहेत. जे कोणत्याही फलंदाजी लाईनला उध्वस्त करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
-चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या युवा खेळाडूला रोहित शर्माने दिल्या टिप्स; पहा व्हिडिओ
-भारताच्या या २० वर्षीय गोलंदाजाचे स्वप्न; मला हवी स्टिव्ह स्मिथची विकेट
-आंद्रे रसेलला फक्त आणि फक्त हा गोलंदाज देऊ शकतो त्रास, पहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख-
-भारताच्या १९ वर्षांखालील संघातील हे ३ खेळाडू आयपीएलसाठी सज्ज, अंतिम अकरामध्ये स्थान निश्चित
-असे ४ क्रिकेटर जे परदेशात जन्मले पण खेळले भारतासाठी क्रिकेट
-…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला