---Advertisement---

चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या युवा खेळाडूला रोहित शर्माने दिल्या टिप्स; पहा व्हिडिओ

---Advertisement---

मुंबई । रोहित शर्मा तरुणांना मार्गदर्शन करण्यापासून कधीही मागे हटत नाही. तो नेहमीच त्यांना शिकवण्यासाठी प्रेरित करतो. आणि हे वर्तन त्याच्या कर्णधारपदाला साजेसं आहे. असे एक दृश्य मुंबई इंडियन्सच्या सरावा दरम्यान दिसून आले. मुंबई इंडियन्सच्या कर्णधार रोहित शर्मा युवा गोलंदाज दिग्विजय देशमुख याला काही टिप्स देतअसल्याचे पाहायला मिळालं.

नेटवर सराव करताना, दिग्विजय सतत चुकीची गोलंदाजी करत होता आणि त्यानंतर वाइड बॉल टाकला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा गोंधळून गेला. त्याने विचारले की काय अडचण आहे? मग दिग्विजय म्हणाला की, मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतर रोहितने त्याला गुडलेथ बॉलिंगवर आपले लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आणि त्याने तसे केले.

यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ पाचवा आयपीएल विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स, 4 वेळा आयपीएलचे जेतेपद मिळविणारा एकमेव संघ आहे.  2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये मुंबई चॅम्पियन बनली आहे.

आयपीएल १३ व्या हंगामाचे वेळापत्रक सहा सप्टेंबरला जाहीर झाले. 19 सप्टेंबरला पहिला सामना अबूधाबी येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि गतवर्षीच्या उपविजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. यावेळी आयपीएळचे सामने युएईमधील अबुधाबी, शारजाह आणि दुबईमध्ये होणार आहेत.

या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुसऱ्या दिवशी दुबईमध्ये सामना रंगणार आहे तर 21सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी शारजाहमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल.

मुंबई इंडियन्सचा संघ

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, क्रुणाल पंड्या, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, आदित्य तारे, सुचित रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डिकॉक, केरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिशेल मॅकक्लेघन, ख्रिस लिनन, सौरभ तिवारी, नाथन कुप्ल्टर नाईल, मोसिन खान, दिग्विजय देशमुख.

महत्त्वाच्या बातम्या – 

वेगवान धावा करत नाही म्हणून संघातून वगळले; याचा राग त्याने काढला अभ्यासावर

मालिकेत सर्वाधिक धावा करूनही ‘त्याला’ ठेवले राखीव खेळाडूंच्या यादीत

अमेरिकन ओपनमध्ये सुपर मॉमचे वर्चस्व; सेरेना-आझारेंका येणार सेमीफायनलमध्ये आमने-सामने

ट्रेंडिंग लेख –

असे ४ क्रिकेटर जे परदेशात जन्मले पण खेळले भारतासाठी क्रिकेट

या माजी कर्णधाराला ‘तो’ सामना खेळण्यात वाटत होती भीती; प्रशिक्षकाचा खुलासा

…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---