fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकन ओपनमध्ये सुपर मॉमचे वर्चस्व; सेरेना-आझारेंका येणार सेमीफायनलमध्ये आमने-सामने

September 10, 2020
in टेनिस, टॉप बातम्या
0

न्यूयॉर्क| २०२० च्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिलांच्या गटात सुपर मॉम्सचे वर्चस्व दिसले आहे. या स्पर्धेत महिलांच्या एकेरी स्पर्धेत सेरेना विल्यम्स आणि विक्टोरिया आझारेंका उपांत्यफेरीत पोहचल्या आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी या दोघीही आई झाल्या आहेत. असे असतानाही दोघींनीही त्यांचा दमदार खेळ यावेळी कायम ठेवला आहे.

आता या दोघीही भारतीय प्रमाणवेळेनुसार ११ सप्टेंबरला पहाटे ६ च्या सुमारास उपांत्यफेरीत आमने सामने असतील. २०१७ ला मातृत्व लाभलेल्या सेरेनाने उपांत्यपूर्व फेरीत त्स्वेताना पिरोन्कोवाला ४-६, ६-३,६-२ असे ३ सेटमध्ये पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर २०१६ ला मुलाला जन्म दिलेल्या आझारेंकाने उपांत्यपूर्व फेरीत एलिस मार्टेन्सला ६-१,६-० असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत उपांत्य फेरीत दिमाखात धडक मारली.

आता सेरेनाचे लक्ष विक्रमी २४ वे ग्रँडस्लॅम विजयाकडे असेल. यासाठी ती गेले ३ वर्षे प्रयत्न करत आहे. तर बिनमानांकित आझारेंका ७ वर्षांनंतर पहिल्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. पण यासाठी अजून दोघींना उपांत्यफेरी आणि अंतिम फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे.

उपांत्यफेरीत पोहचल्याबद्दल आझारेंका म्हणाली, ‘यापेक्षा अधिक चांगले काही होऊ शकते का? माझ्यासाठी नाही. मी आता उत्सुक आहे. एका चॅम्पियनविरुद्ध खेळण्याची मला चांगली संधी मिळाली आहे. जिच्याबद्दल मला आदर आहे, आणि जी माझी मैत्रीण आहे.’

याआधी सेरेनाने आझारेंकाला २०१२ आणि २०१३ ला अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पराभूत केले होते.

अझरेकांने तिचे शेवटचे ग्रँडस्लॅम २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जिंकले होते.

आझारेंकाला लिओ नावाचा मुलगा असून त्याचा ताबा मिळवण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला होता. ज्यामुळे तिच्या कारकिर्दीत चढ-उतार आले. पण अखेर या लढाईत तिला यश आले आणि तिला तिच्या मुलाचा ताबा मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा आझारेंका शानदार कामगिरी करण्यास सज्ज झाली आहे.

तसेच सेरेनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तिने २०१७ ला ऑलिंपिया नावाच्या मुलीला जन्म दिला. ऑलिंपिया अमेरिकन ओपन स्पर्धेदरम्यानही सेरेनाला प्रोत्साहन देताना दिसली आहे. ऑलिंपियाच्या जन्मानंतर सेरेना ४ वेळा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहचली. परंतु तिला ४ वेळाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

आता सेरेना आणि आझारेंका या दोघीही मातृत्व लाभल्यानंतर पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी आतुर आहेत. आत्तापर्यंत ओपन एरा (१९६८ नंतर) मधील केवळ किम क्लिस्टर्स आणि इवोन गुलॅगाँग या दोघींनीच आई झाल्यानंतर महिला एकेरीचे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले आहे.

नाओमी ओसाका विरुद्ध जेनिफर ब्रॅडी –

अमेरिकन ओपन २०२० मधील दुसरा उपांत्य सामना नाओमी ओसाका विरुद्ध जेनिफर ब्रॅडीमध्ये होईल. यांच्यातील जी जिंकेल ती अंतिम फेरीत पोहचेल आणि सेरेना व आझारेंकामधील विजेत्या स्पर्धकाशी अंतिम सामना खेळेल.


Previous Post

जेव्हा सर्वात मोठा प्रतिस्पर्धीच करतो विराट कोहलीचे कौतुक…

Next Post

मालिकेत सर्वाधिक धावा करूनही ‘त्याला’ ठेवले राखीव खेळाडूंच्या यादीत

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

मालिकेत सर्वाधिक धावा करूनही 'त्याला' ठेवले राखीव खेळाडूंच्या यादीत

वेगवान धावा करत नाही म्हणून संघातून वगळले; याचा राग त्याने काढला अभ्यासावर

आंद्रे रसेलला फक्त आणि फक्त हा गोलंदाज देऊ शकतो त्रास, पहा कोण म्हणतंय

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.