fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला

Story of Sachin Tendulkar's First ODI Century

September 9, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजी विक्रमांचा विचार करतो तेव्हा सचिन तेंडुलकर हे नाव सर्वच क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यासमोर येते. फलंदाजीतील बहुतांशी विक्रम हे सचिनच्या नावे आहेत. आधी डॉन ब्रॅडमन, सुनील गावसकर यांच्यानंतर सचिन तेंडुलकरने अनेक विक्रमांची रास लावली. त्याचे समकालीन ब्रायन लारा, रिकी पॉंटिंग, जॅक कॅलिस हेदेखील त्याच्याशी स्पर्धा करत, मात्र सचिन या सर्वांना मागे टाकत पुढे गेला.

आपण सगळे जाणतोच की, सचिन एकमेव असा खेळाडू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण केले आहे . कसोटीत ५१ तर वनडेमध्ये त्याच्या नावापुढे ४६३ सामन्यात ४९ शतकांची नोंद आहे. सध्या, विराट कोहली ४३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके झळकावून सचिनच्या विक्रमाचा पाठलाग करत आहे पण, सध्यातरी या यादीत सचिनच अव्वल आहे.

मात्र, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपले पहिले एकदिवसीय शतक झळकवण्यासाठी पाच वर्षे लागली होती, होय तब्बल पाच वर्ष…

१९८९ च्या पाकिस्तान दौऱ्यावर, वनडे मालिकेआधी इम्रान खान, वसीम अक्रम, वकार युनिस या वेगवान तिकडी सोबतच अब्दुल कादिरसारख्या कसलेल्या फिरकीपटू विरुद्ध कसोटी मालिका छोट्याशा सचिनने गाजवली होती. १८ डिसेंबरबर १९८९ ला गुजरावाला येथे पाकिस्तान विरुद्ध वनडे पदार्पण करताना सचिन अवघे दोन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. खऱ्या अर्थाने सचिनची सुरुवात शून्यानेच झाली.

आपल्या सातत्यपूर्ण खेळामुळे सचिन संघाचा प्रमुख खेळाडू झाला होता. १९९० च्या इंग्लंड दौऱ्यावर त्याने आपले पहिले कसोटी शतक देखील झळकावले. पुढे, १९९२ क्रिकेट विश्वचषकदेखील तो खेळला. या विश्वचषकात भारतातर्फे सर्वाधिक धावा सुद्धा त्याने काढल्या, मात्र पहिले आंतरराष्ट्रीय वनडे शतक काही आले नाही. ठासून ठासून भरलेली प्रतिभा वनडेमध्ये काही कामाला येत नव्हती. अशातच….

१९९४ च्या सिंगर वर्ल्ड सिरीज या चौरंगी मालिकेची घोषणा झाली. श्रीलंकेत आयोजित या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका या आशियाई संघासोबत ऑस्ट्रेलियाचा संघ सहभागी होत होता. कोलंबो येथे यजमान श्रीलंका व भारत यांच्यातील सामन्याने मालिकेला आरंभ होणार होता. मात्र, ४ सप्टेंबर या नियोजित तारखे दिवशी अवघी चार षटके खेळ झाल्यानंतर पावसाने आगमन केले आणि संपूर्ण दिवस वाया गेला. दुसऱ्या दिवशी राखीव दिवस असल्याने, तोच सामना नव्याने खेळला गेला. त्या दिवशी पाऊस आला पण, यावेळी सामना रद्द करण्याची नामुष्की आली नाही. २५ षटकांचा झालेला सामना श्रीलंकेने भारताला पराभूत करत जिंकला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवत स्पर्धेत यशस्वी सुरुवात केली.

मालिकेतील तिसरा सामना ९ सप्टेंबरला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर, पहिल्या सामन्यात पराभूत झालेला भारत व विजय सलामी दिलेल्या ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणार होता. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मनोज प्रभाकर व सचिन तेंडुलकर ही भारताची सलामीवीर जोडी ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजांना तोंड देण्यासाठी मैदानात उतरली.

पहिल्याच षटकात सचिनने ग्लेन मॅकग्राला दोन जबरदस्त कव्हर ड्राईव्ह चौकार मारत दणक्यात सुरुवात केली. दुसरा वेगवान गोलंदाज क्रेग मॅकडरमॉट याला एकाच षटकात चौकार व एक उत्तुंग षटकार ठोकत आज काहीतरी वेगळे होणार आहे याची नांदी दिली. पहिला बदली गोलंदाज आलेल्या फिरकीपटू शेन वॉर्नला दोन स्क्वेअर कटचे चौकार मारत सचिनने ऑस्ट्रेलियन कर्णधार मार्क टेलरचे टेन्शन वाढवले. दुसऱ्या बाजूने, मनोज प्रभाकर नेहमीसारखी टुकूटुकू फलंदाजी करत होता. भारताच्या दहा षटकात ६६ धावा धावफलकावर लागल्या होत्या. भारत एका विशाल धावसंख्येकडे आगेकूच करू लागला होता.

धावफलकावर ८७ धावा लागल्या असताना, शेन वॉर्नने मनोज प्रभाकरला बाद केले. ८७ धावांच्या सलामीत मनोजचे योगदान अवघे २० धावांचे होते. यावरूनच सचिन किती आक्रमक होता याचा अंदाज लावता येईल. मनोजच्या जागी आलेल्या, सिद्धूने २४ धावांचे योगदान दिले तर कर्णधार अझरुद्दीन झटपट ३१ धावा काढत हिलीच्या हाती झेल देत तंबूत परतला. अझरुद्दीन बाद झाला तेव्हा, भारताची धावसंख्या तीन बाद १७३ अशी होती.

आता खेळपट्टीवर दोन मित्र, दोन मुंबईकर उभे होते. लहानपणापासून एकत्र खेळत असलेले सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी ही जोडी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर प्रहार करू लागली. कांबळी स्वभावाच्या विपरीत काहीसा शांत होता तर सचिन आधीपासूनच टाकलेला टॉप गिअर बदलायचे नाव घेत नव्हता.

अखेरीस, ४१ व्या शतकातील वॉर्नच्या दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत सचिनने आपले पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले. वनडे पदार्पणाच्या १७२६ दिवसांनंतर व ७८ सामने खेळल्यानंतर, सचिनच्या बॅटमधून हे शतक आले होते. भारतीय ड्रेसिंग रूम व मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंनी सचिनचे अभिनंदन केले.

पुढच्या षटकात स्टीव वॉला आणखी एक चौकार मारत आपण रौद्ररूप धारण करणार आहोत याचे त्याने संकेत दिले मात्र, क्रेग मॅकडरमॉटच्या यॉर्करवर तो फसला आणि त्रिफळाचीत झाला. एक आक्रमक व अगदी मोजूनमापून केलेली खेळी संपुष्टात आली.

How old were you when @sachin_rt scored his first ODI ton #OnThisDay in 1994?#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPLpic.twitter.com/LEanJ8DxTK

— Mumbai Indians (@mipaltan) September 9, 2020

पुढे, विनोद कांबळीच्या नाबाद ४३ धावांच्या बळावर भारताने २४६ धावा केल्या. २४७ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या २१५ धावा काढू शकला. ऑस्ट्रेलियातर्फे मार्क वॉने सर्वाधिक ६१ धावा केल्या. भारताकडून मनोज प्रभाकर सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने मार्क टेलर, स्टीव वॉ व मॅकडरमॉट हे प्रमुख खेळाडू बाद केले. पुढे जाऊन, भारतानेच ही चौरंगी मालिका आपल्या नावे केली.

सचिन जेव्हा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तेव्हा त्याच्या नावे ४६३ सामन्यात ४९ शतके होती, म्हणजेच पुढील ४८ शतके ३८५ सामन्यात आली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक करण्याचा पराक्रम देखील सचिननेच केला.

वाचा-

-आणि बालपणी ऑटोग्राफ देणाऱ्या क्रिकेटरने पेन नेल्यामुळे ढसाढसा रडलेल्या स्टारची गोष्ट

-तमिळनाडूचा मेकॅनिकल इंजिनीयर आयपीएलमध्ये करोडपती होतो तेव्हा…

-क्रिकेटवेड्या पोरापायी गावातील जमीनदार बाप मोहालीत भाड्याच्या घरात राहू लागला!


Previous Post

उत्साह आयपीएलचा! एकवेळी दुबई जायला नकार देणारा दिग्गज आज दुबईला रवाना

Next Post

या दिग्गजाने निवडला चेन्नई सुपर किंग्सचा प्लेइंग “११”; पहा धोनी,जडेजासह कोणाला मिळाले स्थान

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी

April 11, 2021
Next Post

या दिग्गजाने निवडला चेन्नई सुपर किंग्सचा प्लेइंग "११"; पहा धोनी,जडेजासह कोणाला मिळाले स्थान

मोठी बातमी: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारतीय खेळाडू करतोय पुनरागमन

विराट कोहली बाबर आझमला मागे टाकत टी२०मध्ये या धडाकेबाज खेळाडूची अव्वल स्थानी झेप

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.