मुंबई । युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईची शैली आणि दृष्टीकोन अनिल कुंबळे आणि राशिद खान यांच्या अगदी जवळ आहे. अनिल कुंबळेप्रमाणेच बिश्नोईनेही मध्यमगती गोलंदाज म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली, पण जोधपूरच्या प्रशिक्षकांनी त्याचा कल फिरकीकडे वळविला. रवि बिश्नोई यावर्षी 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळताना दिसला होता, तेथे त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या.
अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल २०२०) त्याला आपला खेळ धारदार करायचा आहे. बिश्नोई म्हणाला की, ‘त्याला कुंबळेबरोबर अधिकाधिक वेळ शिकायचे आहे.’
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्यासाठी त्याला मुरुगन अश्विनशी स्पर्धा करावी लागणार आहे. कर्नाटकचा डावखुरा फिरकी गोलंदाज जे सुचित हा संघातील अन्य फिरकीपटू आहे. बिश्नोई केवळ लेगस्पिनवर अवलंबून नाही तर तो चांगली गुगलीही टाकतो. त्याचे प्राधान्य म्हणजे फ्लिफर्स चेंडू टाकण्यावर असते. दोन कोटी रुपयांत विकत घेतलेल्या या खेळाडूला अनिल कुंबळेचा प्रशिक्षक असल्याने अतिरिक्त फायदा होणार आहे.
रवी बिश्नोई म्हणाला की, “युट्यूबवर मी पाकिस्तान विरुद्ध कुंबळेच्या 10 विकेट्स पाहिल्या आहेत. माझ्या दृष्टीने त्यांच्या संघात खेळणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.”
“मी लॉकडाऊनमध्ये बरेच आयपीएल सामने पाहिले आहेत. सुरुवातीला मी गंमतीसाठी बघायचो, आता कोणता खेळाडू कसा खेळतो, त्याच्या सामर्थ्य व कमकुवत गोष्टींवर लक्ष ठेवत आहे. कोणता फलंदाज कुठल्या गोलंदाजाची धुलाई करतो हे मी पाहत आहे,” असेही बिष्णोईने सांगितले.
20 वर्षीय रवि बिश्नोई आपला पहिला आयपीएल हंगाम खेळणार आहे. तो म्हणाला, “मला संधी मिळताच मी या संधीचं सोनं करीन. पण स्टीव्ह स्मिथला बाद करणे माझ्या यादीत आहे. तो कसोटी क्रिकेटमधील प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे. तो फिरकी गोलंदाजी खूप चांगली खेळतो. ”
महत्त्वाच्या बातम्या –
वेगवान धावा करत नाही म्हणून संघातून वगळले; याचा राग त्याने काढला अभ्यासावर
मालिकेत सर्वाधिक धावा करूनही ‘त्याला’ ठेवले राखीव खेळाडूंच्या यादीत
अमेरिकन ओपनमध्ये सुपर मॉमचे वर्चस्व; सेरेना-आझारेंका येणार सेमीफायनलमध्ये आमने-सामने
ट्रेंडिंग लेख –
असे ४ क्रिकेटर जे परदेशात जन्मले पण खेळले भारतासाठी क्रिकेट
या माजी कर्णधाराला ‘तो’ सामना खेळण्यात वाटत होती भीती; प्रशिक्षकाचा खुलासा
…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला