आयपीएल 2025 18 व्या हंगामातील 16 वा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि लखनऊला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.
मुंबई इंडियन्ससाठी आज खूप मोठा धक्का ठरणार आहे. कारण आज रोहित शर्मा सामना खेळणार नाही. दुखापतीच्या कारणाने तो आज सामना खेळू शकणार नाही.
मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली तर लखनऊ ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील. मुंबईने मागच्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत सामना जिंकला होता. लखनऊ ने हंगामात तीन सामन्यांमध्ये एक सामना जिंकला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन:-
मुंबई:- हार्दिक पांड्या, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, नमन धीर, राज अंगद बावा, मिशेल सेंटनर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चाहर, विघ्नेश पुथुर.
लखनऊ:- ऋषभ पंत, एडन मायक्रम, मिचेल मार्श, निकोलस पुरण, आयुष बडोनी, डेविड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान.






