---Advertisement---

INDvsWI 2nd ODI: रोहित शर्माचे खास द्विशतक! एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले ‘असे’

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2026 12:35 PM
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारी (३० सप्टेंबर) दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. यामध्ये भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने शतकी खेळी केली आणि आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत आणखी एका विश्वविक्रमाची नोंद केली.

गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहितने ३२ चेंडूत अर्धशतक शतक केल्यानंतर एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो एकाच देशात २०० षटकार मारणारा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला. या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १४७ षटकार मारले. यावरूनच एकाच देशात एकदिवसीय क्रिकेटमध्ये षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत रोहित किती आघाडीवर आहे, हे स्पष्ट होते.

या सामन्यात वेस्ट इंडिजने तीन शतकी खेळीच्या जोरावर भारताला ४०६ धावसंख्येचे लक्ष्य होते, जे रोहित आणि शुभमन गिल यांनी चौकार-षटकरांचा पाऊस पाडत सोपे केले.

या सामन्यात वेस्ट इंडिजच्या जॉन कॅम्पबेल, शाई होप, अमीर जांगू यांनी शतके केली. दुसरीकडे भारताकडून रोहितने शतक आणि गिलने नाबाद द्विशतक केले. रोहितने ७५ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने १०१ धावा केल्या. हे त्याचे ३५वे एकदिवसीय शतक ठरले.

गिलने १३३ चेंडूंत २६ चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने नाबाद २२३ धावा केल्या. भारताने ४३.३ षटकांतच लक्ष्य गाठले आणि हा सामना ८ विकेट्सने जिंकला. तसेच ऋतुराज गायकवाड ३१ धावांवर नाबाद राहिला.

एकदिवसीय क्रिकेटचा इतिहास पाहिला, तर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितनेच केला आहे. त्याने या प्रकारामध्ये ३७० पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. या यादीत पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी दुसऱ्या, तर गेल तिसऱ्या स्थानावर आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
रोहित शर्मा – ३७८*
शाहिद आफ्रिदी – ३५१
ख्रिस गेल – ३३१
सनथ जयसूर्या – २७०
एमएस धोनी – २२९

तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत यजमान भारत २-० असा आघाडीवर आहे. तिसरा सामना ३ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. (INDvsWI 2nd ODI Rohit Sharma Becomes 1st batter to smash 200 ODI sixes in single country)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---