---Advertisement---

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राशिद खानचे ‘द्विशतक’! 200 विकेट्स घेणारा जगातील पहिलाच गोलंदाज ठरला

On: शुक्रवार, ऑक्टोबर 30, 2026 8:08 AM
26184210181bb48
---Advertisement---

29 ऑक्टोबरची तारीख टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात खास ठरणार आहे. रशीद खान हा या फॉरमॅटमध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. शारजाह येथे अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 221 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना, रशीद खानने 9व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तदिवनाशे मारुमानीला बाद करून हा ऐतिहासिक टप्पा गाठला.

अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू आणि जागतिक क्रिकेटमध्ये सामना फिरवणारा गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा रशीद खान, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. सध्या तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रशीदला 200 बळी पूर्ण करण्यासाठी केवळ एका बळीची गरज होती, जी त्याने तदिवनाशे मारुमानीला बाद करून पूर्ण केली. रशीद खानने आपल्या 120व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 200 बळींचा टप्पा गाठला असून, त्याची गोलंदाजी सरासरी 13.99 इतकी प्रभावी राहिली आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

रशीद खान (अफगाणिस्तान) – 200*
आदिल रशीद (इंग्लंड) – 171
एहसान खान (हाँगकाँग) – 165
ईश सोधी (न्यूझीलंड) – 165
टिम साउथी (न्यूझीलंड) – 164

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात, अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली होती, अवघ्या 5 धावांत त्यांचे 4 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर अजमतुल्ला उमरझाईने पुढाकार घेत शानदार शतक (116 धावा) झळकावले, ज्यामुळे संघाला 200 धावांच्या जवळ पोहोचण्यास मदत झाली. रशीद खानने धावसंख्या 200 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली; त्याने डावाच्या शेवटच्या षटकात 4 षटकार लगावले आणि अवघ्या 6 चेंडूंवर नाबाद 25 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---