वनडे क्रिकेटच्या सुरुवातीला फलंदाजांना कसोटी क्रिकेटमुळे सावकाश खेळी करताना पहायला मिळत होते. वनडेत सुनील गावसकरांनी केलेली 36 धावांची खेळी हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. यानंतर हळू-हळू या क्रिकेट प्रकारात सुधारणा झाली आणि खेळाडूं वेगाने खेळू लागले. जुन्या काळात विवियन रिचर्ड्स हे वनडेतील धडाकेबाज खेळाडू समजले जात होते. भारतीय संघातही 80 आणि 90 च्या दशकात काही धडाकेबाज खेळाडू आले. परंतु विरेंद्र सेहवागच्या येताच गोलंदाजांच्या मनात एकच भीती निर्माण झाली.
वनडे क्रिकेटमध्ये काळानुसार बदल झाले. टी20 क्रिकेट आल्यामुळे खेळाडूंना वनडे क्रिकेटमध्येही अधिक आक्रमक पद्धतीने खेळण्याची सवय झाली. त्याचमुळे वनडे क्रिकेटच्या शेवटच्या 10 षटकांमध्येही अधिक वेगाने धावा करताना पहायला मिळतात. भारतीय संघाव्यतिरिक्त जगातील अनेक संघांवर टी20 क्रिकेटचा चांगलाच फरक पडला.
अनेक खेळाडू असे असतात, ज्यांना चेंडू बाऊंड्रीलाईनच्या पलीकडे पाठविण्यास भलतीच मजा येते. त्यांच्या मते चेंडूची खरी जागा ही बाऊंड्रीलाईनच्या पलीकडेच असते.
याच मानसिकतेमुळे गोलंदाजांनाही फलंदाजांसमोर विचार करूनच गोलंदाजी करावी लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक तुफान फलंदाज होऊन गेले आहेत. परंतु या लेखात आपण 3 धुरंदर फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये 500 पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला असून त्यांचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे.
वनडे क्रिकेटमध्ये (कमीतकमी 500 चेंडूंचा सामना केल्यानंतर) सर्वाधिक स्ट्राईक रेट असणारे 3 सर्वात फलंदाज – 3 Batsmen With Highest Strike Rate in ODI
3. जॉस बटलर
इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर वनडे क्रिकेटमध्ये 8 वर्षांपेक्षा अधिक काळ खेळत आहे. त्याने या दरम्यान 142 सामने खेळले आहेत. त्याने जवळपास 119 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने 3843 धावा केल्या आहेत. त्याचा हा स्ट्राईक रेट पाहून समजते, की खेळपट्टीवर आल्यानंतर तो चेंडू कुठला कुठे पाठविण्याचा विचार करत असेल.
वनडेत सर्वात वेगवान खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा तिसरा क्रमांक लागतो. बटलरवर टी20 क्रिकेटचा जरा जास्तच प्रभाव आहे. वेगवेगळ्या देशांच्या टी20 स्पर्धांमध्ये तो खेळतो. आयपीएलमध्ये बटलर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो.
2. ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) वनडे क्रिकेटमध्ये 8 वर्षे झाली आहेत. यादरम्यान त्याने 110 सामने खेळले आहेत. परंतु चेंडू बाऊंड्रीलाईनच्या बाहेर पाठविण्यात तो अधिक विश्वास ठेवतो. मॅक्सवेलने 123 पेक्षाही अधिक स्ट्राईक रेटने तब्बल 2877 धावा केल्या आहेत. वनडेत सर्वाधिक स्ट्राईकरेट असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मॅक्सवेलचा दुसरा क्रमांक लागतो.
1. आंद्रे रसेल
वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू आंद्रे रसेलवर टी20 क्रिकेटचा अधिक प्रभाव पडलेला पाहिले आहे. वनडे क्रिकेटमध्ये 9 वर्षांपासून खेळणाऱ्या रसेलला संघात नियमित स्थान मिळाले नाही. परंतु स्टाईक रेटबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा स्ट्राईक रेट हा जागतिक वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक आहे.
56 वनडे सामने खेळताना 130 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने त्याने 1034 धावा केल्या आहेत. तो खालच्या फळीत फलंदाजी करतो. त्याला अधिक संधी मिळाली, तर नक्कीच त्याच्या धावसंख्येत कमालीची वाढ होऊ शकते.
वाचनीय लेख-
-भारतीय संघाचे ‘हे’ ३ धुरंदर फलंदाज; जे वनडेत ठोकू शकतात रोहितप्रमाणेच द्विशक
-वनडेत धोनीने त्या ३ धडाकेबाज खेळी करूनही भारताच्या पारड्यात आले नाही यश
-सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात मैदान गाजवत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज