आयपीएलचा 18वा हंगाम सुरू व्हायला अद्याप बराच कालावधी बाकी आहे. आगामी हंगामापूर्वी मेगा लिलावाचं आयोजन केलं जाईल, ज्यापूर्वी अनेक मोठ्या खेळाडूंना संघातून रिलिज केलं जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडून आयपीएल 2025 च्या लिलावात सहभागी होणार आहे.
रोहित सारखा मोठा खेळाडू प्रत्येक ऑक्शनमध्ये उतरत नाही. त्यामुळे अनेक फ्रँचाईझी हिटमॅनची लिलावात उतरण्याची वाट पाहत आहेत. तसं पाहिल तर, आरसीबीच्या संघात रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूची गरज आहे. आम्ही तुम्हाला 3 कारणं सांगतो, ज्यामुळे आरसीबीनं 2025 आयपीएल लिलावात रोहित शर्मावर बोली लावली पाहिजे.
(3) नव्या कर्णधाराची आवश्यकता – आयपीएल 2025 साठी आरसीबीला नव्या कर्णधाराची आवश्यकता आहे. रिपोट्सनुसार, आरसीबी कर्णधार फाफ डू प्लेसिसला रिटेन करणार नाही. तो गेल्या 3 हंगामात संघाला ट्रॉफी जिंकवून देण्यात अपयशी ठरला. अशा परिस्थितीत टीम मॅनेजमेंट नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. रोहितशिवाय ही जबाबदारी कोण योग्यपणे निभावू शकतो? त्यानं आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळा ट्रॉफी जिंकवून दिली आहे.
(2) रोहित ट्रॉफीचा दुष्काळ संपवू शकतो – आरसीबी आयपीएलमध्ये पहिल्या हंगामापासून खेळत आहे. मात्र अद्याप टीम एकदाही ट्रॉफी जिंकू शकलेली नाही. रोहित संयुक्तपणे आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. याशिवाय त्याच्याकडे नेतृत्वाचा दांडगा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वातच भारतानं 2024 टी20 विश्वचषक जिंकला होता. रोहितचा हा अनुभव आरसीबीला फार उपयोगी ठरू शकतो.
(1) शानदार फलंदाज – रोहित टी20 फॉरमॅटचा किती मोठा फलंदाज आहे, ही बाब कोणापासूनही लपून राहिलेली नाही. तो जेव्हा आपल्या लयीत असतो, तेव्हा जगातील कोणताही गोलंदाज त्याच्यासमोर टिकू शकत नाही. आरसीबीनं जर रोहितला आपल्या संघात शामिल करून घेतलं, तर तो विराटसोबत मिळून विरोधी गोलंदाजाचे धाबे दणाणून सोडू शकतो.
हेही वाचा –
‘कामगिरी दाखवा संघात स्थान मिळवा’, बांग्लादेशविरुद्ध संधी मिळणे सोपे नाही
‘बाबर आझम हट्टी, निवड समितीचे ऐकत…’, पाकिस्तानच्या माजी निवडकर्त्याचा गंभीर आरोप!
युवराज सिंगच्या वडीलांना एमएस धोनीचा तिरस्कार का? जाणून घ्या तीन कारणे