क्रिकेटच्या १४३ वर्षांच्या इतिहासात अनेक महान गोलंदाज लाभले. या महान गोलंदाजींमध्ये बरीच मोठी नावं आहेत. कसोटी क्रिकेटच्या स्वरूपाबद्दल बोललो तर काही यशस्वी गोलंदाजांनी बरेच बळी मिळवून विक्रम केले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये वसीम अक्रम, चामिंडा वास, ग्लेन मॅकग्रा किंवा कपिल देव यासारखे गोलंदाज होऊन गेले, परंतु या दिग्गज गोलंदाजांना ६०० बळींचा आकडा गाठता आला नाही. ६०० बळींचा टप्पा फक्त मुथिय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे या ३ गोलंदाजांनी पार केला आहे.
सध्याच्या काळात खेळणाऱ्या गोलंदाजांमध्ये अशी काही नावे आहेत ज्यांची कसोटी विकेटमध्ये ६०० बळींचा आकडा गाठण्याची क्षमता आहे. येत्या काळात कसोटी क्रिकेटमधील ६०० बळींचा जादुई आकडा ओलांडू शकतील अशा तीन गोलंदाजांबद्दल या लेखात जाणून घेऊया.
येत्या काळात कसोटीत ६०० बळी मिळवू शकतील हे ३ गोलंदाज-
जेम्स अँडरसन (James Anderson)
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा सध्याच्या कसोटी क्रिकेटमधील एक आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. जेम्स अँडरसन हा सक्रिय गोलंदाजांमधील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज आहे. तो आपल्या स्विंग आणि लाइन-लेंथने यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.
अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून बरेच दिवस दूर आहे, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. जेम्स अँडरसनने आतापर्यंत १५५ कसोटी सामने खेळले असून त्याने ५९३ बळी (१४ ऑगस्ट २०२० पर्यंत) मिळवले आहेत. त्याला ६०० बळींचा टप्पा गाठायला केवळ ७ बळींची आवश्यकता आहे. तो येत्या काही सामन्यांमध्ये या टप्प्यावर पोहोचू शकतो.
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad)
जेम्स अँडरसनप्रमाणेच इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचेही इंग्लंड क्रिकेट संघात योगदान व वर्चस्व आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा सध्याचा सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक आहे. जेम्स अँडरसनप्रमाणेच तो कसोटी क्रिकेट नियमित खेळत आहे.
ब्रॉडने आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत ५१० बळी (१४ ऑगस्ट २०२० पर्यंत) घेतले आहेत. त्याने इंग्लंडकडून आतापर्यंत १४२ कसोटी सामने खेळले आहेत. २००७ पासून तो सतत खेळत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो ७ व्या क्रमांकावर आहे. त्याला ६०० बळी पूर्ण करण्यासाठी ९० बळी मिळवायचे आहेत जो येत्या काही वर्षांत करु शकतो.
आर अश्विन (R Ashwin)
भारतीय क्रिकेट इतिहासात फिरकी गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि बिशनसिंग बेदी या फिरकी गोलंदाजांची नावे मोठ्या सन्मानाने घेतली जातात. तसेच आर अश्विनचे नावही गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. अश्विन सध्या भारतीय संघासाठी कसोटी स्वरूपातील सर्वात प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखले जातो. अश्विन गेली अनेक वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
तो कसोटीत वेगाने बळी मिळवत आहे. ज्याने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत ७१ कसोटी सामन्यांमध्ये ३६५ बळी घेतले आहेत. त्याला अजून ६०० बळींचा आकडा गाठण्यासाठी मोठा प्रवास करायचा आहे, परंतु तो ज्या वेगाने बळी घेत आहे त्यानुसार येत्या काही वर्षांत ६०० बळींच्या जादुई आकड्याला मागे टाकू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार – एक स्कॉलर खेळाडू
वनडे आणि टी२० मधील २ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू, जे कसोटीमध्ये ठरले सुपर फ्लॉप
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला धू धू धुणारा क्रिकेटर आज कुणाला आठवतही नाही
आयपीएलमधील बेंगलोर संघासाठी आदित्य ठाकरे करणार गोलंदाजी
स्वातंत्र्यानंतर प्रत्येक दशकात भारताला मिळाला एकतरी हिरो, जाणून घ्या प्रत्येकाबद्दल