आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परंतु, असे ही कर्णधार आहेत, ज्यांनी नेतृत्वाच्या बळावर संघाला विजय मिळवून दिले. क्लाइव्ह लॉयड, इमरान खान, कपिल देव, रिकी पाँटिंग, सौरव गांगुली आणि एमएस धोनी हे सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक मानले जातात, ज्यांनी अनेक मोठ-मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
तसेच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणे ही खूप मोठी गोष्ट असते. दरम्यान असेही काही कर्णधार होऊन गेले आहेत, ज्यांनी आयसीसीच्या सलग 3 स्पर्धांमध्ये आपल्या संघाला अंतिम फेरीत नेण्याचा पराक्रम केला आहे. आज आम्ही त्याच कर्णधारांबद्दल अधिक माहिती देणार आहोत.
1) क्लाइव्ह लॉयड : साल 1980 च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघाचा बोलबाला होता. त्यावेळी वेस्ट इंडिज संघाचे कर्णधारपद क्लाइव्ह लॉयड यांच्याकडे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाने सलग 2 वनडे विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. तर तिसऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
वेस्ट इंडिज संघाने 1975 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर 1979 मध्ये देखील क्लाइव्ह लॉयड यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने जेतेपदावर आपले नाव कोरले होते. इतकेच नव्हे तर 1983 वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील वेस्ट इंडिज संघाने प्रवेश केला होता. त्यांना विजयाची हॅट्रिक करण्याची सुवर्ण संधी होती. परंतु, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. 1983 वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपद पटकावले होते.
2) सौरव गांगुली : एमएस धोनीला सर्वोत्तम कर्णधार मानले जाते.कारण त्याने आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. परंतु, एमएस धोनी येण्यापूर्वी सौरव गांगुलीने मोठा कारनामा केला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली जहीर खान, आशिष नेहरा, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि युवराज सिंग हे क्रिकेटपटू घडले होते.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2000 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2002 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर 2003 वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
3) केन विलियम्सन : काही वर्षांपूर्वी न्यूझीलंड संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत होते. परंतु, केन विलियम्सनने संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून या संघात पूर्णपणे बदल झाला आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने आयसीसीच्या सलग 3 स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
न्यूझीलंड संघाने 2019 वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. ज्यात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर 2021 मध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला पराभूत केले. तर, आयसीसी टी20 विश्वचषक 2021 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत केले होते. 2022च्या टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीत न्यूझीलंड पाकिस्तानकडून पराभूत झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्याला केन विल्यमसन मुकणार, नेतृत्वपद ‘या’ खेळाडूकडे
एफसी गोवाने हिरो आयएसएलमध्ये एटीके मोहन बागानला प्रथमच नमवले; चाहत्यांचे मन जिंकले