---Advertisement---

कधीकाळी ‘या’ ३ क्रिकेट स्पर्धांचा होता बोलबाला, आजही क्रिकेटप्रेमींचे करू शकतात भरपूर मनोरंजन

On: शनिवार, जुलै 31, 2021 8:16 AM
---Advertisement---

आजच्या घडीला अनेक देश क्रिकेट खेळतात आणि पाहतात सुद्धा. क्रिकेटबाबत आता अनेक देशात लोकप्रियता वाढू लागली आहे. क्रिकेटमध्ये काळानुसार अनेक बदल झाले. प्रामुख्याने त्यांच्या स्वरूपात बदल झाले. पूर्वी केवळ कसोटी सामने खेळले जायचे. त्यानंतर एकदिवसीय सामने आणि आता एक सर्वात लोकप्रिय स्वरूप आहे ते म्हणजे टी-२० क्रिकेट.

क्रिकेटची लोकप्रियता पाहता व क्रिकेटबद्दल रुची निर्माण करण्याकरिता काही क्रिकेट बोर्डांकडून आणि आयसीसीकडून काही स्पर्धांचे आयोजन करण्यात येत होते. या स्पर्धा सुरुवातीला खेळवल्या गेल्या. परंतु कालांतराने काही कारणांमुळे त्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या. त्यातीलच काही स्पर्धा आहेत ज्या आजही पुन्हा सुरू करायला हव्यात असे क्रिकेटप्रेमींना वाटेल. त्या म्हणजे…

१) आयसीसी सुपर सिरीज – आयसीसी सुपर सिरीजचे आयोजन सर्वप्रथम २००५ साली ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आले होते. ही स्पर्धा त्यावेळचा अव्वल स्थानावर असणारा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित संघातील सदस्यांचे एकत्रित संघ अशी खेळविण्यात येत असत. यात ३ एकदिवसीय सामने आणि १ कसोटी सामना खेळला जात असत. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने एकहाती वर्चस्व राखले होते. एकाही सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाला नव्हता. आयसीसीने प्रत्येक चार वर्षांत ही स्पर्धा करण्याचे आयोजिले होते. परंतु तसे झाले नाही आणि ही स्पर्धा रद्द झाली.

२) चॅंपियन्स लीग टी२० – या स्पर्धेची घोषणा २००८ सालीच झाली होती. परंतु ही स्पर्धा २००९ सालापासून खेळविण्यात येऊ लागली. ही स्पर्धा क्रिकेटमधला सर्वात लोकप्रिय प्रकार टी-२० या स्वरुपात खेळविण्यात येत असत. यात जगभरातील विविध ठिकाणी खेळविण्यात येणाऱ्या स्पर्धेचे (लीग) अव्वल क्रमांकाचे संघ खेळायचे. ही स्पर्धा बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका या तीन बोर्डांनी मिळून आयोजित केली होती. परंतु याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून २०१४ साली शेवटची ही स्पर्धा खेळविण्यात, आली ज्यात चेन्नई सुपर किंग्सने ती स्पर्धा जिंकली.

३) एफ्रो अशिया कप – ही स्पर्धा सर्वप्रथम २००५ मध्ये खेळवण्यात आली होती. ही स्पर्धा आफ्रिका XI आणि आशिया XI यांच्यात खेळविण्यात आली होती. या स्पर्धेला आयसीसीने देखील मान्यता दिली होती. या स्पर्धेचा मुख्य उद्देश आशिया क्रिकेट कौन्सिल आणि आफ्रिका क्रिकेट कौन्सिल यांना धनराशी गोळा करणे हा होता. या स्पर्धेचे दोनच पर्व आयोजित करण्यात आले होते. पहिल्या पर्वात दोन्ही संघ बरोबरीत राहिले. नंतर २००७ साली दुसऱ्या पर्वातील स्पर्धेत ३ एकदिवसीय आणि १ टी-२० सामना खेळवला गेला. यात आशिया XI ने एकहाती या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले. परंतु नंतर काही कारणाने ही स्पर्धा रद्द करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

वर्ष २०११च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे शिलेदार, जे अजूनही खेळतायत क्रिकेट

असे ४ निवृत्त क्रिकेटपटू, जे आजही गाजवू शकतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मैदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---