टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शनिवारी (24 ऑगस्ट) सकाळी त्यानं एक व्हिडिओ मॅसेज टाकून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धवनला आयसीसी स्पर्धांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखलं जायचं. मात्र गेल्या काही काळापासून त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हतं. यामुळे त्यानं निवृत्तीची घोषणा केली.
शिखर धवनच्या निवृत्तीनंतर आता आणखी काही खेळाडू क्रिकेटला अलविदा करू शकतात. एकेकाळी हे खेळाडू भारतीय संघाचे महत्त्वाचे सदस्य होते, मात्र आता त्यांना संघात संधी मिळेनाशी झाली आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशाच 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.
(3) इशांत शर्मा – टीम इंडियाचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज इशांत शर्मा गेल्या बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. त्यानं 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. मात्र आता संघात नव्या गोलंदाजांची एंट्री झाल्यामुळे इशांतला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही. यानंतर आता तो निवृत्ती घेऊ शकतो. इशांतनं भारतासाठी 105 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 14 टी20 सामने खेळले आहेत.
(2) चेतेश्वर पुजारा – राहुल द्रविडनंतर टीम इंडियाची अभेद्य भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजाराचं आता संघात पुनरागमन होणं अशक्य दिसत आहे. त्यानं 2023 मध्ये भारतासाठी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर त्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्यात आलं आहे. पुजारानं भारतासाठी 103 कसोटी सामन्यांमध्ये 7 हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
(1) भुवनेश्वर कुमार – आपल्या धारदार स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. भुवीनं 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. एकेकाळी हा वेगवान गोलंदाज टीम इंडियाचा नियमित सदस्य होता. मात्र आता त्याला पुन्हा संघात संधी मिळण्याची शक्यता जवळपास संपली आहे. यामुळे तो देखील निवृत्तीची घोषणा करू शकतो.
हेही वाचा –
आलिशान घर, महागड्या गाड्या; शिखर धवन कोट्यावधी संपत्तीचा मालक, पाहा नेटवर्थ
10 वर्ष मोठ्या महिलेशी लग्न केलं, छळाचं कारण देत घटस्फोट घेतला! खूपच वेदनादायी आहे शिखर धवनची लव्ह स्टोरी
जेव्हा गब्बरनं तुटलेल्या अंगठ्यानं ऑस्ट्रेलियाला धुतलं होतं! धवनची ही खेळी चाहते कधीच विसरणार नाहीत