---Advertisement---

आक्रमक फलंदाजी बनलीय ‘या’ खेळाडूंची ओळख, वनडेत १२०पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने कुटल्यात धावा

---Advertisement---

क्रिकेट हा खेळ मुळातच ‘द जेंटलमन्स गेम’ म्हणून ओखळला जातो. क्रिकेटच्या अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हा केवळ कसोटी सामने खेळले जायचे तेव्हापासून धिम्या गतीने बचावात्मक फलंदाजी करणे हेच या खेळाचे वैशिष्ट्य राहिले होते आणि हे चित्र जेव्हा एकदिवसीय सामने खेळले जाऊ लागले त्यातही दिसू लागले. त्यावेळी विकेट वाचून खेळण्यावर भर दिला जात होता. पण कालांतराने याचे स्वरूप बदलू लागले. त्यावेळी विव रीचर्डस यांनी खुलून आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली आणि म्हणून त्यावेळी त्यांना एकदिवसीय सामन्यातील आक्रमक फलंदाज म्हटले जायचे. त्यानंतर थोड्या फार प्रमाणात खेळाडू आक्रमक फलंदाजी करू लागले.

वेळेनुसार क्रिकेटमध्ये आजपर्यंत खूप बदल झाले. त्यामुळे खेळाडूंच्या खेळाचे स्वरूप सुद्धा बदलले आणि टी-२० हे क्रिकेटमधले लहान स्वरूप असलेला प्रकारही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाऊ लागला. यात केवळ २० षटके असल्याने संघाची धावसंख्या वाढविण्यासाठी फलंदाजांच्या फलंदाजीत आणखीन आक्रमकता दिसू लागली. याचाच परिणाम एकदिवसीय सामन्यात सुद्धा दिसू लागला. सुरुवातीला विकेट वाचून शेवटच्या काही षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करून हव्या त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात आजकालचे खेळाडू सक्षम आहेत. त्यातीलच असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आक्रमक खेळीने क्रिकेटविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

१) आंद्रे रसेल – क्रिकेट त्यातही आक्रमक खेळी आणि त्यात वेस्ट इंडिज संघाच्या खेळाडूचा समावेश नसेल तर कसे? आंद्रे रसलने आजपर्यंत केवळ ५६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात १०३४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १३० पेक्षाही जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. जो कोणत्याही खेळाडूचा सर्वात जास्त स्ट्राइक रेट आहे.

२) ग्लेन मॅक्सवेल – हा खेळाडू कोणत्या क्रिकेटरसिकांना माहित नसावा हे क्वचितच. तो मुळातच त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मॅक्सवेलने त्याच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत ११६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १२५ च्या स्ट्राईक रेटने ३२३० धावा केल्या आहेत.

३) जोस बटलर – इंग्लंडमध्ये आजपर्यंत अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर. ज्याने आजपर्यंत अनेक वेळा आक्रमक खेळी करून त्याच्या संघाला विजय मिळवून दिला आहे. बटलरने आतापर्यंत १४८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११९ च्या स्ट्राईक रेटने ३८७२ एवढ्या मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सूर्यकुमार यादव फलंदाजच आहे तसा, तो भविष्यात मोठमोठी शतके ठोकेल,’ पाकिस्तानातून कौतुक

‘कोणत्या सामन्यांची हायलाईट पाहायला आवडते?’ सचिन तेंडुलकरने दिले ‘हे’ उत्तर

‘सत्तर वर्षांनंतर पुनरागमन करतोय’ म्हणत चहलकडून भुवीची थट्टा, मग काय चिडला सिनीयर गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---