भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज सुर्यकुमार यादव याने फार कमी काळात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. टी२० सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर नुकतेच श्रीलंकेविरुद्ध त्याला वनडेतही संधी मिळाली आहे. आपल्या पदार्पणाच्या वनडे मालिकेतही त्याने प्रभावी फलंदाजी केली आहे. त्याचा खेळ पाहुन प्रभावित झालेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार सलमान बट्ट यांनीही त्याच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना त्यांनी सुर्यकुमार यादवचे गुणगान गायले आहेत.
ते म्हणाले की, “फलंदाज सूर्यकुमार यादवमध्ये एवढी क्षमता आहे की, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात मोठमोठी शतके करू शकतो. तसेच विकेटची चिंता न करता त्याची धावा बनविण्याची गतीही अधिक आहे. खूप मोठ्या काळानंतर त्याला भारतीय क्रिकेट संघात संधी मिळाली आहे. पण संघात खेळायची संधी मिळाल्यानंतर त्याने संधीचे सोने केले आहे. आपल्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्याने सगळ्यांनाच प्रभावित केलं आहे.”
“सूर्यकुमार शॉट निवडीमध्ये पटाईत आहे. अगदी तो मोठमोठे शॉ जरी मारत असला तरीही ते गॅपमध्ये खेळतो. मला तो खूप समजदार खेळाडू वाटतो. तो फिरकी गोलंदाजांना खूप चांगला ओळखतो. सध्या श्रीलंकेच्या संघात सर्व गोलंदाज धिम्या गतीने गोलंदाजी करण्यात माहीर आहेत. त्यामुळे त्याला फलंदाजीत जास्त अडचण येत नाहीये. मिस्ट्री स्पिनरविरुद्धही को खूप शानदार प्रदर्शन करतो. तो उगाच हवेत फटके मारत नाही तर तो एक क्लास फलंदाज आहे. माझ्या मते, तो भविष्यात खूप मोठी मोठी शतके करेल,” असेही सलमान बट्ट म्हणाले.
“विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्यासारखे दिग्गज खेळाडू भारतीय क्रिकेट संघात आहेत आणि सुर्यकुमार यादव हे यांच्यापेक्षा कमी नाही. जेव्हा जेव्हा सुर्यकुमारला संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांचा खेळ चांगलाच राहिला आहे,” असं सलमान बट्ट म्हणाले.
भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेत सूर्यकुमारने दमदार फलंदाजी केली. त्याने एक अर्धशतकही झळकावले. संपूर्ण मालिकेत यशस्वी खेळल्याबद्दल सुर्यकुमारला ‘मॅन ऑफ द सिरीज’ या किताबाने गौरवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सत्तर वर्षांनंतर पुनरागमन करतोय’ म्हणत चहलकडून भुवीची थट्टा, मग काय चिडला सिनीयर गोलंदाज
आहा कडक! मिचेल स्टार्कच्या चेंडूने अलगद उडवली दांडी, गिरकी घेत दूरवर जाऊन पडला स्टंप
पृथ्वी शॉच्या इंग्लंडला जाण्याने ‘या’ दोघांवर वाढला दबाव, चांगली कामगिरी करण्याचे असेल आव्हान