सुरुवातीच्या काळात क्रिकेटला संथ खेळ म्हणून ओळखले जायचे. कसोटी सामने हे दिवसाच्या मर्यादा न ठेवता खेळवले जात असत. नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले. कसोटीनंतर एकदिवसीय आणि आता टी२० हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. कसोटी क्रिकेटला संथ स्वरुप मानले जाते. मात्र असे काही खेळाडू आहेत ज्यांना या प्रकारांनी काहीच फरक पडत नाही. कोणत्याही प्रकारात ते प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकटमधील असे काही खेळाडू आहेत ज्यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात एकाच गतीने धावा काढल्या आहेत. वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकीपटू या फलंदाजांच्या जलद गतीने धावा करण्याच्या भुकेवर कोणताच परिणाम पडत नव्हता. या लेखातून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील असे तीन फलंदाज ज्यांची बॅट सतत तळपत राहिली ते कोण? हे आपण पाहणार आहोत.
१) विवियन रिचर्ड्स
वेस्ट इंडीजचा सुरुवातीच्या काळातील बलाढ्य संघाचा हा फलंदाज. विवियन रिचर्ड्सने कोणत्याच गोलंदाजाला आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही. ज्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज बचावात्मक खेळाला प्राधान्य देत असत, त्या काळात रिचर्ड्स तुफानी खेळी करत असे. कसोटीमध्ये त्याने ८५४० तर वनडेमध्ये ६७२१ इतक्या धावा काढल्या.
२) ख्रिस गेल
क्रिकेटच्या तीनही प्रकारांत ज्याने धावांचा डोंगर उभा केला तो खेळाडू म्हणजे ख्रिस गेल. त्याने टी२० प्रकारात अधिकच आक्रमक खेळ केला आणि अर्थातच वनडे आणि कसोटीत देखील त्याचा खेळ बहरला. आयपीएलमध्येही त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना १७५ धावांची खेळी केली होती. तर कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याच्या नावावर त्रिशतकी खेळी जमा आहे. बहुतांश वेळा गेलचा भर हा जागेवरूनच षटकार खेचण्यावर असतो. गोलंदाज कोणताही असो गेलची बॅट तळपत राहिली आहे.
३) वीरेंद्र सेहवाग
भारताच्या वीरेंद्र सेहवागने जगातील दिग्गज जलदगती गोलंदाज आणि उत्कृष्ट फिरकीपटूचा सहजतेने सामना केला. त्याने कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता प्रत्येक प्रकारात शानदार फलंदाजी केली. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये दोनदा त्रिशतकी खेळी केली. याशिवाय वनडेमध्येही त्याने द्विशतक झळकावले आहे. फलंदाजी करताना खेळपट्टीची आणि हवामानाची काळजी न करता तो नेहमी आक्रमक फलंदाजी करत असायचा.
महत्त्वाच्या बातम्या-
धावत्या रेल्वेत रंगला हिंदी शिकवणीचा क्लास, भारतीय फलंदाज जेमिमाने विदेशी मैत्रिणींना दिले धडे
धवनने ‘रनमशीन’ कोहलीचा विक्रम केला ध्वस्त, धावा चोपण्याच्या विक्रमात बनला ‘अव्वल’