आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सुरुवातीच्या काही हंगामात कर्णधारपदाची जबाबदारी सौरव गांगुलीकडे होती. खरंतर त्या काळात कोलकाता संघाची चांगली कामगिरी झाली नाही. सौरव गांगुलीला देखील आयपीएलच्या तीन हंगामानंतर केकेआरमध्ये कायम ठेवण्या आले नाही. त्याच्यानंतर गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाची कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आणि येथूनच संघाने यश प्राप्त करण्यास सुरुवात केली.
गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा चॅम्पियन बनवले. सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे शक्य झाले. कोलकाता नाईट रायडर्सने २०१२ मध्ये प्रथमच विजेतेपद जिंकले आणि त्यानंतर या संघाने २०१४ मध्ये दुसऱ्यांदा जेतेपद जिंकले.
गौतम गंभीरच्या काळात या संघाने प्रत्येक मोठ्या संघाचा पराभव केला. ख्रिस लिन, सुनील नरेन आणि रॉबिन उथप्पा यांसारख्या अनेक दिग्गजांनी सर्वोत्कृष्ट खेळाच्या जोरावर संघाच्या यशामध्ये भर घातली. केकेआरने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली व सर्वोत्तम संघात स्थान मिळवले. प्रत्येक संघाची कामगिरी त्यांच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीवर अवलंबून असते. पण काही असेही खेळाडू होते जे केकेआरकडून खेळत असताना अपयशी ठरले, ज्यांचा या लेखात उल्लेख केला आहे..
कोलकाता नाइट रायडर्सचे ३ अपयशी खेळाडू
ट्रेंट बोल्ट (Trent Bolt)
न्यूझीलंडच्या या खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०१७ च्या आयपीएलमध्ये ५ कोटी देऊन विकत घेतले होते. यावेळी ट्रेंट बोल्टने ६ सामन्यांत ५ गडी बाद केले होते. पहिल्या तीन सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही. त्यानंतर स्पर्धेच्या शेवटी त्याला तीन सामन्यांमध्ये परत संधी देण्यात आली.
त्याने आयपीएलमध्ये मध्ये एकूण ३३ सामने खेळले असून त्यात त्याने ३८ बळी मिळवले आहेत. यंदा तो मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे.
मिशेल जॉन्सन (Michelle Johnson)
मिशेल जॉन्सन या ऑस्ट्रेलियन गोलंदाजानेही केकेआरसाठी खराब प्रदर्शन केले. मिशेल जॉन्सन एक उत्तम गोलंदाज आहे. त्याने केकेआरकडून पाच सामन्यात फक्त २ बळी घेतले आहेत. या वेगवान गोलंदाजाने लाजीरवाणी कामगिरी होती. आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या ५४ सामन्यात त्याला ६१ बळी घेण्यात यश आले आहे.
मोहम्मद हफीझ (Mohammad Hafeez)
आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. केकेआरकडून मोहम्मद हाफिजने एकूण ८ सामने खेळले आणि फक्त ६४ धावा केल्या. याशिवाय त्याने गोलंदाजीत केवळ दोन गडी बाद केले. आयपीएलमधील त्याने वयक्तिक केलेली १६ धावांची खेळी जी त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. केकेआरला त्याच्याकडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या कृत्यामुळे वसीम अक्रमची आगपाखड
-सीपीएलमध्ये जेसन होल्डरच्या संघाची नवीन उल हक पुढे सपशेल शरणागती
-मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाचे पाणी पाजण्यासाठी विराट उतरेल ‘या’ ११ खेळांडूसोबत
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार
-आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!
-आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज