आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आता पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमींना फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा पुरेपूर आनंद लूटता येईल. यावेळी आयपीएल कोरोना व्हायरसच्या परिस्थिती खेळले जाणार आहे. अशामध्ये आयपीएलमध्ये असे काही परदेशी खेळाडू खेळताना दिसतील, जे आयपीएलमध्ये पदार्पण करतील. त्या परदेशी खेळाडूंवर सर्वांची नजर असेल.
चला तर मग जाणून घेऊया आयपीएलमध्ये १३ व्या मोसमातून पदार्पण करु शकणाऱ्या परदेशी खेळाडूंबद्दल…
१. इसरु उडाना
श्रीलंकेचा खेळाडू इसरू उडाना (Isuru Udana) आयपीएल २०२०मध्ये आपले पदार्पण करेल. उडानाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ५० लाख रुपयांच्या मूळ किंमतीत आपल्या संघात सामील केले आहे. त्याने आतापर्यंत ३० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३१.९१ च्या सरासरीने २४ विकेट्स घेतल्या आहेत तसेच २३० धावाही केल्या आहेत. आवश्यकतेनुसार तो धडाकेबाज फलंदाजी करतानाही दिसू शकतो. आता हे पाहणे रंजक ठरेल की उडानाला या आयपीएलमध्ये संधी मिळाली, तर तो कर्णधार विराट कोहलीला सामना जिंकण्यात मदत करतो की नाही.
२. टॉम बॅंटन
इंग्लंडचा विस्फोटक सलामी फलंदाज टॉम बॅंटन (Tom Banton) आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसेल. केकेआरने त्याला आयपीएल २०२०च्या लिलावात १ कोटी रुपये देऊन आपल्या संघात सामील केले आहे. बँटन टी२० क्रिकेट प्रकारात तुफान फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्याने जानेवारी २०२० मध्ये बिग बॅश लीगमध्ये ब्रिसबेन हीट संघाकडून खेळताना सिडनी थंडरविरुद्ध अर्जुन नायरच्या गोलंदाजीवर एका षटकात सलग ५ षटकार ठोकले होते.
This is just extraordinary.
Tom Banton launches five consecutive sixes! #BBL09 pic.twitter.com/STYOFVvchy
— KFC Big Bash League (@BBL) January 6, 2020
केकेआर संघाला मागील मोसमात सलामीबद्दल समस्या निर्माण झाली होती. ख्रिस लिनच्या इतर संघात जाण्याने बँटनवर केकेआर संघाला धडाकेबाज सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. इंग्लंडच्या या फलंदाजाने आतापर्यंत ३४ देशांतर्गत टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १५७.३३ च्या स्ट्राईक रेटने ९४४ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या नावावर १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त त्याने ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १६४.७० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
३. ऍलेक्स कॅरे
ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरेही (Alex Carey) यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण सामना खेळताना दिसू शकतो. कॅरेला आयपीएल २०२०च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने २.४० कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. कॅरेने २८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १२४.४६ च्या स्ट्राईक रेटने १७३ धावा केल्या आहेत. तसेच एकूण ७४ ट्वेंटी२० सामन्यात त्याने १३१.२५ च्या स्ट्राईक रेटने १६२१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ट्वेंटी२०मध्ये १ शतक आणि ८ अर्धशतकेही ठोकली आहेत.
४. ख्रिस ग्रीन
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ख्रिस ग्रीनला (Chris Green) कोलकाता नाईट रायडर्सने २० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले आहे. ग्रीनने आतापर्यंत ८२ ट्वेंटी२० सामने खेळताना १२७.७७ च्या स्ट्राईक रेटने ५०६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना ६५ विकेट्सही घेतल्या आहेत.
ख्रिसला अद्याप ऑस्ट्रेलिया संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. परंतु केवळ २६ वर्षांच्या वयात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ख्रिस एक चांगला फिरकीपटू गोलंदाज आहे. या आयपीएलमध्ये तो कशाप्रकारे कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
५. शेल्डन कॉटरेल
वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेलला (Sheldon Cottrell) किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ८.५ कोटींच्या मोठ्या रकमेत आपल्या संघात सामील केले आहे. कॉटरेल आयपीएल २०२० मध्ये आपले पदार्पण करू शकतो. १४० ते १५० किलोमीटर प्रती तासच्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला आयपीएलमध्ये खेळताना पाहणे रंजक ठरेल.
कॉटरेलने आतापर्यंत ८८ ट्वेंटी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १९.१५ च्या सरासरीने १२३ विकेट्स घेतल्या आहेत. पंजाब संघाने त्याला इतक्या मोठ्या रकमेने आपल्या संघात सामील करण्यामागील कारण म्हणजे त्याच्या गोलंदाजीतील विविधता आहे.
ट्रेंडिंग लेख –
-२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद…
-आख्ख्या कसोटी करियरमध्ये एकही षटकार फलंदाजाला मारु न देणारे महारथी
-धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी