क्रिकेट इतिहासात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. खेळाडू त्यांच्या फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षणाच्या जोरावर मोठमोठे विक्रम करतात. काही खेळाडूंच्या नावावर नकोशा विक्रमांचीही नोंद होते. फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर, खेळाडूंना फलंदाजी करताना मोठ्या आकडी धावा करण्यासाठी चौकार किंवा षटकारांची गरज भासते. वनडे, टी२० अशा मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात अधिकतर फलंदाज चौकार किंवा षटकार मारण्याच्या प्रयत्नात असतात. कसोटी क्रिकेटसारख्या अमर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातही चौकार किंवा षटकारांचा वर्षाव होताना दिसतो. मात्र, गोलंदाज हे नेहमी फलंदाजांना बाद करणे, निर्धाव षटक टाकणे किंवा कमीत कमी धावा देण्याच्या प्रयत्नात असतात.
तसं पाहिलं तर, कोणत्याही गोलंदाजासाठी त्याच्या पूर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकही षटकार न देणे ही जवळपास अशक्य गोष्ट आहे. परंतु, असेही काही गोलंदाज आहेत, ज्यांनी त्यांच्या पूर्ण कसोटी कारकिर्दीत ५ हजारपेक्षा जास्त चेंडू टाकले. पण त्यांच्या गोलंदाजीवर एकही षटकार गेला नाही.
तर जाणून घेऊयात, त्या ४ दमदार गोलंदाजांविषयी – 4 International Cricketers Of The World History Who Never Conceded 6 During Test Career
महमूद हुसैन (Mahmood Hussain)
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज महमूद हुसैन यांनी भारत दौऱ्यावर विशेष कामगिरी केली होती. स्वातंत्र्यानंतर १९५२-५३ साली भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या पहिल्या कसोटी मालिकेत महमूद यांनी शानदार प्रदर्शन केले होते. लखनऊ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून महमूद यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी ४ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. तसेच संघाला एका डावाच्या आघाडीवर आणि ४३ धावांनी विजय मिळवून दिला होता.
महमूद यांनी आपल्या १० वर्षाच्या कसोटी कारकिर्दीत २७ सामने खेळले होते. यादरम्यान त्यांनी ५९१० चेंडू टाकले आणि ६८ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या गोलंदाजीवर एकही षटकार दिला नाही.
मुदस्सर नजर (Mudassar Nazar)
मुदस्सर नजर यांचाही या यादीत समावेश होतो. पाकिस्तानच्या या मध्यमगती गोलंदाजाने आपल्या १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत फलंदाजांना एकही षटकार दिला नाही. पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद नजर यांचा मुलगा मुदस्सर यांनी १९७६ पासून ते १९८९ पर्यंत पाकिस्तान संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. यादरम्यान त्यांनी ७६ कसोटी आणि १२२ वनडे सामने खेळले होते. कसोटी कारकिर्दीत मुदस्सर यांनी ५९६७ चेंडू टाकत ६६ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.
नील हॉक (Neil Hawke)
ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज नील हॉक यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दमदार गोलंदाजी प्रदर्शनामुळे १९६३ला ऑस्ट्रेलिया संघामध्ये निवड झाली होती. हॉक यांनी त्यांच्या ५ वर्षांच्या छोट्या कसोटी कारकिर्दीत २७ कसोटी सामने खेळले होते. दरम्यान त्यांनी ६९७४ चेंडू टाकत ९१ विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या गोलंदाजीवर फलंदाजांना एकही षटकार मारु दिला नव्हता. शिवाय, प्रथम श्रेणीत हॉक यांनी १४५ सामन्यात ४५८ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
कीथ मिलर (Keith Miller)
ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज कीथ मिलर हे त्यावेळचे उत्कृष्ट गोलंदाज होते. १९४६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी आपले कसोटी पदार्पण केले होते. पुढे ते ऑस्ट्रेलिया संघाचे दमदार अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला आले. १९४६ ते १९५६ दरम्यान मिलर यांनी ५५ कसोटी सामने खेळत १७० विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, आपल्या कसोटी कारकिर्दीत १०४६१ चेंडू टाकूनही त्यांनी फलंदाजाला एकही षटकार दिला नाही.
ट्रेंडिंग लेख –
या ३ युवा खेळाडूंना आयपीएल २०२० स्पर्धा ५ महिने पुढे…
झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
क्रिकेट वेडापायी वसईचा पाटील खेळला युएईकडून; कर्णधार होऊन केले भारताविरुद्धच दोन हात, वाचा संपुर्ण…
महत्वाच्या बातम्या-
सुशांत सिंगचा दिल बेचरा पाहून भावुक झाला भारतीय क्रिकेटर, लिहीला अतिशय भावनिक…
कोरोनाच्या काळात या दिग्गज क्रिकेटरच्या घरात आली खुशखबरी,…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद झाला आहे सचिन,…