पुणे (20 मार्च 2024) – आजच्या दिवसाचा तिसरा सामना कोल्हापूर विरुद्ध मुंबई शहर यांच्यात झाला. कोल्हापूर ने प्रमोशन फेरीतील पहिला सामना जिंकला होता तर मुंबई शहर ला सांगली कडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. कोल्हापूरच्या ओमकार पाटील व सौरभ फगारे यांच्या आक्रमक खेळीने व बचवाफळीच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोल्हापूर संघाने मुंबई शहर ला ऑल आऊट करत 10-00 अशी आघाडी मिळवली.
मुंबई शहर कडून प्रणिल म्हात्रे व तुषार शिंदेच्या खेळीने मुंबई शहर ने प्रतिकार केला मात्र कोल्हापूर संघाने मध्यंतरा पर्यत 18-09 अशी आघाडी मिळवली. कोल्हापूरने मध्यंतरा नंतर आपला आक्रमक खेळ कायम ठेवत सामन्यावर पकड मजबूत केली होती. कोल्हापूर सांघिक खेळ बघायला मिळाला. चढाईपटू सोबत बचावपटूंनी सुद्धा उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
कोल्हापूर संघाने मुंबई शहर ला संपूर्ण सामन्यात 3 वेळा ऑल आऊट करत सामना 42-19 असा जिंकला. कोल्हापूर कडून चढाईत ओमकार पाटील ने 8 गुण व सौरभ फगारे ने 7 गुण मिळवले. तर पकडीत दादासो पुजारीने 5 पकडी करत हाय फाय पूर्ण केला. धनंजय भोसले ने 3, वैभव राबाडे ने 3 व साईप्रसाद पाटील ने 2 पकडीत गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. मुंबई शहर कडून तुषार शिंदे ने 7 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- ओमकार पाटील, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- दादासो पुजारी, कोल्हापूर
कबड्डी का कमाल – दादासो पुजारी, कोल्हापूर
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या 17 व्या हंगामात असे आहेत कर्णधार आणि बदल झालेले दहा संघ, वाचा सविस्तर
मराठमोळ्या ऋतुराजची कर्णधार होताच पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाला,’ मला फार काही…