मुंबई । सचिन तेंडुलकरने किती आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत किंवा ऑस्ट्रेलियन संघ किती वेळा रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे, हे बर्याच क्रिकेट चाहत्यांना चांगलेच आठवणीत असेल. पण जगात अशी काही मोजके चाहते असतील की त्यांना सचिन तेंडुलकर, माहेला जयवर्धने, रिकी पॉन्टिंग हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू किती वेळा बाद झाले आहेत, हे ठाऊक असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद झालेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत सचिनच्या नावाची नोंद आहे. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटेल.
आपल्या 24 वर्षांच्या कारकीर्दीत 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय सामने आणि एक टी -20 सामना खेळणार्या सचिनने 100 शतकेसह एकूण 34 हजार 357 धावा केल्या. या काळात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 708 वेळा बाद झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा माहेला जयवर्धने दुसर्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. एकूण 652 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्या जयवर्धनेने 54 शतकांच्या मदतीने 25 हजार 957 धावा केल्या. तो 663 वेळा बाद झाला.
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 42 शतकांसह एकूण 21 हजार 32 धावा करणारा सनथ जयसूर्या हा 616 वेळा बाद झाला. आपल्या कार्यकीर्दीत तो एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जात होता.
श्रीलंकेचे माजी दिग्गज दिग्गज कुमार संगकाराने 513 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 63 शतकांसह 28 हजार 16 धावा केल्या आणि या काळात 599 वेळा बाद झाला.
आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला दोनदा विश्वचषक जिंकणारा रिकी पॉटींग 560 सामन्यात 598 वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या नावावर 27 हजार 483 धावा आहेत. तो ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार मानला जातो.
महत्त्वाच्या बातम्या-
–मुंबई इंडियन्स आहे आयपीएल विजेतेपदाचा दुसरा प्रबळ दावेदार, तर या संघाला आहे सर्वाधिक संधी
–१९८३ विश्वविजेत्या भारतापेक्षा पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाले होते २६पट जास्त पैसे, रमीज राजाने शेअर केला फोटो
–आयर्लंडच्या क्रिकेटरला होतोय स्टेडियमधील खुर्च्यांचा त्रास, चेंडू शोधायला जातोय खूप वेळ
–आयपीएल २०२०साठी हा संघ सर्वात आधी जाणार दुबईला, काहाही करुन जिंकायची आहे आयपीएल ट्रॉफी
वाचनीय लेख-
–क्रिकेट वेडापायी वसईचा पाटील खेळला युएईकडून; कर्णधार होऊन केले भारताविरुद्धच दोन हात, वाचा संपुर्ण स्टोरी
–झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
–टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ४- शैलीच्या विपरीत खेळत डिविलीयर्सने २२० चेंडूत ३३ धावा केल्या, परंतू क्रिकेटरसिकांच्या हृदयात..