---Advertisement---

आयर्लंडच्या क्रिकेटरला होतोय स्टेडियमधील खुर्च्यांचा त्रास, चेंडू शोधायला जातोय खूप वेळ

On: सोमवार, जुलै 27, 2020 8:10 AM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी रोझ बाऊलच्या मोकळ्या स्टेडिअममध्ये क्रीम रंगाच्या खुर्च्या असल्यामुळे पांढरा चेंडू शोधण्याच्या बाबतीत आयर्लंडने चिंता व्यक्त केली आहे. मालिकेतील ३ सामने जैविक- सुरक्षित वातावरणात मोकळ्या स्टेडिअममध्ये खेळण्यात येणार आहेत. त्या सामन्यांचे आयोजन ३० जुलै, १ आणि ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

आयर्लंडचे मुख्य प्रशिक्षक ग्राहम फोर्ड (Graham Ford) यांनी आपल्या संघाच्या खेळाडूंशी सरावादरम्यान याबाबतीत चिंता व्यक्त केली. कारण खेळाडूंना स्टेडिअममध्ये खुर्च्यांच्या क्रीम रंगामुळे पांढरा चेंडू शोधण्यास अडचण येत होती. फोर्ड यांनी ‘व्हर्च्युअल पत्रकार परिषद’मध्ये म्हटले, “बॅकग्राऊंडबाबत थोडीशी अडचण आहे.”

“स्टेडिअममध्ये बसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खुर्च्यांचा रंग एकतर पांढरा आहे किंवा क्रीम रंगाचा आहे. स्टेडियम मोकळे आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षकांसाठी बॅकग्राऊंड हे एकप्रकारे आव्हानच असणार आहे,” असे ते पुढे म्हणाले.

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना याच मैदानावर खेळण्यात आला होता. तरीही लाल रंगाचा चेंडू शोधण्यात खेळाडूंना अधिक समस्या आली नाही.

आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबिर्नीने (Andrew Balbirnie) म्हटले, ही कठीण परिस्थिती आहे. परंतु त्याने अपेक्षा व्यक्त केली की एक आठवड्याच्या सरावामुळे खेळाडूंसाठी गोष्टी सहज होतील.

तो म्हणाला, “हे जरा गोंधळात टाकणारे असेल. पांढरा चेंडू क्रीम किंवा पांढऱ्या खुर्च्यांच्या मागे शोधणे कठीण असेल. परंतु आमच्याकडे बराच वेळ आहे, जेणेकरून आम्हाला हे एक निमित्त म्हणून घेता येणार नाही, याची खात्री करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघालाच यूएईत जिंकता आला नाही एकही सामना; पहा कोणी किती सामने जिंकलेत

-येत्या काळात क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळू शकतात या ४ मोठ्या क्रिकेट मालिका

-येत्या काळात क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळू शकतात या ४ मोठ्या क्रिकेट मालिका

ट्रेंडिंग लेख-

-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग २- असामान्य खेळाडूकडून झालेली असामान्य खेळी

-भारतीय क्रिकेट वर्तुळात अतिशय आदराने नाव घेतले जाणारे एनकेपी साळवे होते तरी कोण?

जगातील ३ सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; २ आहेत भारतात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---