जगभरात असे अनेक स्टेडियम आहेत जे विविध कारणांनी लक्षात रहातात. क्रिकेट स्टेडियम हे खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळेही बऱ्याचदा आठवणीत राहतात. उदाहरणार्थ, लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर शतक झळकावणाऱ्या फलंदाजांचा वेगळा आदर-सन्मान असतो. जगात अशी अनेक क्रिकेट स्टेडियम आहेत ज्यांची वेगळी ओळख आहे. प्रेक्षकांना या स्टेडियममधील सामने पाहण्याचा एक वेगळाच आनंद देखील मिळत असतो.
वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील स्टेडियम भारतातील स्टेडियमपेक्षा कितीतरी मोठे आहेत. तसेच श्रीलंकेनंतर युएईमध्ये बरीच मोठी स्टेडियम आहेत. तसेच अशीही काही स्टेडियम आहेत ज्यांची लांबी जास्त नसली तरी प्रेक्षकांची क्षमता जास्त आहे. अशी अनेक आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहेत. स्टेडियमचे सौंदर्य सामना चार चांद लावण्यास मदत करते.
या लेखात जगातील तीन सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमबद्दल जाणून घेण्यात आले आहे. सुविधा आणि प्रेक्षकांच्या क्षमतेवर आधारित या लेखामध्ये त्या तीनही स्टेडियम बद्दल माहिती दिली आहे.
३. ईडन गार्डन (Eden Gardens)
ईडन गार्डन्स, जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे. हे मैदान भारतीय क्रिकेटचा मक्का म्हणून ओळखला जातो. कोलकाता येथे वसलेले हे स्टेडियम बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येते. सौरव गांगुली अध्यक्ष झाल्यानंतर या स्टेडियममध्ये अनेक सुधारणा झाल्या. ईडन गार्डनमध्ये ६६ हजाराहून अधिक लोक बसू शकतात. येथे पहिला सामना १९३४ मध्ये इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाने खेळला होता. तसेच या स्टेडियमच्या अनेक आठवणी भारतीय चाहत्यांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. याच मैदानावर राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने ऑस्ट्रेलिया विरुद्ध फॉलोऑन मिळालेला असतानाही पूर्ण दिवस फलंदाजी करत भारतासाठी मोलाची कामगिरी केली होती. तसेच याच मैदानावर रोहित शर्माने वनडेतील सर्वोच्च २६४ धावांची खेळी केली होती.
२. मेलबर्न क्रिकेट मैदान (Melbourne Cricket Ground)
ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या या सुंदर स्टेडियमची एक वेगळी ओळख आहे. इथे एक लाखाहून अधिक प्रेक्षक बसून सामन्याचा आनंद लुटू शकतात. प्रेक्षकांच्या क्षमतेच्या बाबतीत हे जगातील दुसरे सर्वात मोठे स्टेडियम आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर आधुनिक सुविधांसह खेळणे प्रत्येक खेळाडूसाठी एक आनंददायक अनुभव आहे. या ठिकाणी मार्च १८७७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला सामना खेळाला गेला.
१. मोटेरा स्टेडियम (Motera Stadium)
अहमदाबादमधील हे स्टेडियम १९८२ मध्ये बांधले गेले होते. परंतु आता त्याचे नूतनीकरण करून नवीन मोटेरा स्टेडियम २०२० मध्ये बांधले गेले. अहमदाबादमधील हे स्टेडियम गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीने येथे एक लाख दहा हजार प्रेक्षक बसू शकतात. याशिवाय येथे कॉर्पोरेट बॉक्स, पार्किंग आणि खेळाडूंसाठी विविध सुविधा आहेत. त्याला अत्याधुनिक स्टेडियम म्हणता येईल. कारण येथे पावसाळ्यातही सामने पाहायला मिळतील. पावसाळ्यातही सामने होतील अशा पद्धतीने हे स्टेडियम बांधण्यात आले आहे. लवकरच या मैदानावर क्रिकेट सामने खेळले जातील. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.
वाचनीय लेख –
असे ५ भारतीय फलंदाज, ज्यांनी कसोटीत केले अनेक शतके पण वनडेत मात्र ठरले अपयशी
–आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये झाली तर या ४ संघांना होणार फायदा
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या ह्या ५ खेळाडूंनी आजही केली असती दमदार कामगिरी…