क्रिकेटप्रेमींना ज्या टी२० लीगची आतुरता नेहमी लागून रहाते, ती लीग अर्थात आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तिसऱ्यांदा आयपीएल भारताबाहेर अर्थातच संयुक्त अरब अमिरातीमध्ये होतं आहे.
लिलावादरम्यान सर्व संघांनी त्यांच्या भारतीय खेळपट्टांना अनुसरुन संघ निवडला. पण आता यावेळची आयपीएल युएई होणार आहे. ज्यामुळे काही संघांचे बरेच नुकसान होऊ शकते. त्याच बरोबरच बर्याच संघांना याचा खूप फायदा होऊ शकतो.
या लेखात त्या ४ संघांबद्दल आपण जाणून घेऊ ज्यांना आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये झाली तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्या संघांचे खेळाडू युएईच्या मैदानावर अधिक प्रभावी ठरू शकतात.
१. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने घरचे मैदान डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंची खरेदी करून टीम तयार केली. आता आयपीएल २०२० युएईमध्ये होणार आहे, तर याचा चेन्नई सुपर किंग्ज संघाला सर्वाधिक फायदा होईल. याच कारण युएईमधील खेळपट्टी असू शकते.
चेन्नई सुपर किंग्ज संघात बरेच चांगले फिरकीपटू आहेत. ज्यामध्ये हरभजन सिंग, रवींद्र जडेजा, मिशेल सेंटनर, इम्रान ताहिर आणि आता पियुष चावलाचे नाव जोडल गेल आहे. त्यामुळे युएईच्या कोणत्याही खेळपट्टीवर या खेळाडूंमध्ये फलंदाजांना रोखण्याची क्षमता आहे. युएईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. ज्यामुळे सामन्यांमध्ये मोठा फरक पडू शकतो.
२. कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders)
शाहरुख खानच्या सहमालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला इथे मोठी संधी असेल. यूएईला आयपीएल हलवण्याच्या निर्णयामुळे हा संघ देखील आपला आनंद साजरा करत असावा. आयपीएलचे २ वेळा विजेतेपद जिंकलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला पुन्हा एकदा स्वत: ला सिद्ध करण्याची मोठी संधी असेल.
कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये पियुष चावला या वेळी नसला, तरी त्यांच्याकडे फिरकीतील कुलदीप यादव आणि सुनील नारायणसारखे दिग्गज फिरकीपटू आहेत. जे यूएई खेळपट्टीवर खूप प्रभावी सिद्ध होऊ शकतात. नितीश राणा हा देखील कोलकाता संघात आहे. जो चांगला अष्टपैलू होऊ आहे.
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाताकडे आता फिरकीपटूंचा चांगला सामना करणारे फलंदाज सुद्धा आहेत. युएईच्या खेळपट्ट्यांवर ते फार महत्वाचे ठरतील. त्या फलंदाजानमुळे संघाला एक आत्मविश्वास मिळेल. मैदान मोठं असल्याने आंद्रे रसेलची भूमिकादेखील पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण होईल.
३. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादलाही यूएईमध्ये मोठी संधी मिळू शकेल. हैदराबाद संघात कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नर आपल्या संघाला चॅम्पियन बनविण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघात चांगले फिरकी गोलंदाजही आहेत. ज्यामध्ये राशिद खान, मोहम्मद नबी आणि शाहबाज नदीम यांची नावे आहेत. अनुभवामुळे हे खेळाडू युएईच्या मैदानावर आश्चर्यकारक प्रदर्शन करू शकतात. तर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी यूएईमध्ये बरेच क्रिकेटही खेळले आहे.
तसेच हैदराबाद संघाच्या मधल्या फळीमध्ये भारतीय फलंदाज आहेत. ज्यांना फिरकी गोलंदाजी चांगली खेळता येते. ज्यामुळे त्याचा दावा अधिक दृढ असल्याचे दिसून येईल.
४. दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals)
युवा खेळाडू श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल संघाला देखील मोठा फायदा होऊ शकतो. दिल्ली कॅपिटल संघाने यावेळी असे काही निर्णय घेतले आहेत. ज्याने त्यांना या परिस्थितीत खूप मजबूत केले आहे. त्यांच्याकडे अमित मिश्रा आणि आर अश्विनच्या रूपात आयपीएलचे दोन दिग्गज फिरकीपटू आहेत. त्याचबरोबर अक्षर पटेल देखील संघाला उपयुक्त ठरेल.
श्रेयस अय्यरच्या संघातही एक चांगला फिरकी गोलंदाजी खेळणारा फलंदाज अजिंक्य रहाणे आहे. रहाणेमुळे संघाची बाजू मजबूत आहे. तसेच रिषभ पंत, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या खेळाडूंचा संघाला जबरदस्त फायदा मिळेल.