---Advertisement---

रत्नागिरी विरुद्ध अहमदनगर सामना अंतिम चढाईत बरोबरीत राहिला

Kabaddi
---Advertisement---

पुणे (8 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आतापर्यंत टॉप ला असलेल्या दोन संघात आजची महत्वपूर्ण लढत झाली. अहमदनगर संघ तीन विजयासह मैदान उतरला होता तर रत्नागिरी संघ 2 विजय व 1 पराभवासह मैदानात उतरला होता. दोन्ही संघांनी सावध खेळ करत सामन्याची सुरुवात केली. प्रफुल झवारे व आशिष यादव यांनी सुरुवातीच्या दोन चढाईत गुण मिळवत 3-0 अशी सुरुवात केली होती.

रत्नागिरीच्या अमरसिंग कश्यप ने चढाईत तर निलेश शिंदे पकडीत गुण मिळवत सामना 7-7 असा बरोबरीत आणला. पहिल्या हाफच्या शेवटच्या काही मिनिटात प्रसाद गोरे ने उत्कृष्ट पकडी करत अभिषेक मपारी ने चढाईत गुण मिळवत मध्यंतराला 14-09 अशी रत्नागिरी संघाला आघाडी मिळून दिली होती.

रत्नागिरीच्या अभिषेक शिंदे ने मध्यंतरा नंतर अष्टपैलू खेळ करत सामन्यात चुरस आणली होती. अहमदनगरच्या चढाईपटू व पकडपटू यांनी सांघिक प्रदर्शन करत सामन्यात आघाडी कायम ठेवली. शेवटचे दोन मिनिटं शिल्लक असताना रत्नागिरीच्या अमरसिंग कश्यप ने दोन खेळाडूंना बाद करत अहमदनगर संघाला ऑल आऊट करत 26-26 असा सामना बरोबरीत आणला. त्यानंतर प्रफुल झवारे ने सलग दोन चढाईत गुण मिळवत 2 गुणांची आघाडी मिळवली होती. शेवटची काही सेकंद शिल्लक असताना रत्नागिरीच्या अमरसिंग कश्यप ने गुण मिळवत अहमदनगर संघाला शेवटची चढाई करण्यासाठी भाग पाडले. शेवटच्या चढाईत प्रफुल झवारे ला क्रॉस लाईन करून यायचं होता पण त्याची आविष्कार पालकर ने जबरदस्त पकड करत सामना बरोबरीत सोडला. या स्पर्धेतील हा पहिला सामना टाय झाला.

बेस्ट रेडर- अमरसिंग कश्यप, रत्नागिरी
बेस्ट डिफेंडर- संकेत खलाटे, अहमदनगर
कबड्डी का कमाल- आविष्कार पालकर, रत्नागिरी

महत्वाच्या बातम्या – 
IPL 2024 : आयपीएलमधील 5 स्टार भारतीय खेळाडू जे कधीच आपल्या घरच्या संघाकडून खेळले नाहीत
अटीतटीच्या लढतीत रत्नागिरी संघाची रायगड संघावर मात.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---