पुणे (8 मार्च 2024)- के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज चौथ्या दिवशी शेवटचा सामना मुंबई शहर विरुद्ध बीड यांच्यात झाला. मुंबई शहरच्या जतिन विंदे व सनी कोळी यांनी चढाईत गुण मिळवत 2-0 अशी सुरुवात करून दिली. बीड कडून सांकेत चौधरी व राहुल टेके गुण मिळवत संघाचा खात उघडला. त्यानंतर दोन्ही संघांनी सावध खेळ करत सामना 6-6 बरोबरीत आणला असताना जितन विंदे ची पकड करत बीड संघाने आघाडी मिळवली. त्यानंतर राहुल टेके ने अंतिम दोन खेळाडूंना बाद करत मुंबई शहर ला ऑल आऊट केला.
राहुल टेके व शंकर मेघाने ने आक्रमक चढाया करत संघाला गुण मिळवून दिले. तर संदेश देशमुख ने उत्कृष्ट पकडी करत मुंबई शहर संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत आपली आघाडी वाढवली. मध्यंतरा पर्यत बीड संघाने 22-11 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतर ही बीड संघाने आपली आघाडी कायम ठेवली.
बीडच्या राहुल टेके ने चढाईत 9 गुण मिळवले तर संदेश देशमुख ने एक सुपर टॅकलसह पकडीत 8 गुण मिळवत संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. बीड संघाने 37-27 असा विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली मुंबई शहरची तिसऱ्या स्थानावरून पाचव्या क्रमांकवर घसरण झाली.
बेस्ट रेडर- राहुल टेके, बीड
बेस्ट डिफेंडर- संदेश देशमुख, बीड
कबड्डी का कमाल- संदेश देशमुख, बीड
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : आयपीएलमधील 5 स्टार भारतीय खेळाडू जे कधीच आपल्या घरच्या संघाकडून खेळले नाहीत
अंतिम चढाईत वैभवच्या सुपर रेड ने धुळे संघाचा रोमहर्षक विजय