fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२०मध्ये चाहत्यांना मिस कराव्या लागणार या ५ अतिशय रोमांचक गोष्टी

September 16, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


कोरोना व्हायरसच्या भारतातील वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या हंगामाला तब्बल ६ महिने उशीर झाला आहे. तरीही क्रिकेटप्रेमींमध्ये या स्पर्धेबद्दलची उत्सुकता तसुभरही कमी झालेली नाही.

तसेच कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल आयोजित करताना अनेक बदल करावे लागतील. त्याचा विचार करता यावर्षी आयपीएलमध्ये चाहत्यांना काय काय बदल पहायला मिळू शकतात याचा घेतलेला हा आढावा –

भारतीय प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन पहाता येणार नाही सामने –

यावर्षी भारतात आयपीएल होण्याची शक्यता फारच कमी आहे. भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे ११ लाखांहूनही अधिक आहेत. तसेच अनेक गोष्टींवर सध्या बंधने आहेत. अशा परिस्थितीत भारतात आयपीएलचे आयोजन करणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे जर भारताबाहेर आयपीएल झाले तर अनेक भारतीय प्रेक्षकांना भारतात स्टेडियममध्ये जाऊन आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देता येणार नाही.

प्रेक्षकांशिवाय होऊ शकतात आयपीएलचे सामने – 

कोरोना व्हायरसचा फटका केवळ भारतालाच नाही तर जगभरातील अनेक देशांना बसला आहे. त्यामुळे काही काळासाठी क्रिकेटही ठप्प झाले होते. अशा परिस्थिती आयपीएल सामन्यांदरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी मिळणे कठिण आहे.

पण असे असले तरी नुकतेच पटेल यांनी म्हटले आहे की यूएईला जर आयपीएलचा हा मोसम झाला तर यूएई सरकारच्या नियामांनुसार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी आहे की नाही, हे पहावे लागले. जरी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नसली तरी ते घरी बसून टीव्हीवर तसेच ऑनलाईन सामन्यांची मजा घेऊ शकतात.

चिअरलीडर्सची अनुपस्थिती 

आयपीएलमध्ये प्रत्येक मोसमात चौकार-षटकार फलंदाजांनी मारल्यानंतर किंवा गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी बाऊंड्री लाईनच्या बाहेर चिअरलीडर्स डान्स करताना दिसल्या आहेत. पण आता जर कोरोना व्हायरससाठी दिले गेल्या गाईडलाईन्सनुसार सोशल डिस्टसिंग पाळायचे असेल आणि जर मैदानात प्रेक्षकांची उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह असताना चिअरलीडर्सच्या अनुपस्थितीच २०२० चा आयपीएल मोसम पार पडू शकतो.

सुपरफॅनला मिळणार नाही स्वाक्षरी केलेला चेंडू –

मागील काही आयपीएल मोसमांदरम्यान ज्या शहरात सामना होत आहे, त्या शहरातील एका चाहत्याची एक स्पॉन्सरकडून सुपरफॅन म्हणून निवड केली जायची. त्या चाहत्याला स्टेडियममधील स्पेशल बॉक्समध्ये बसून सामना पाहण्याची संधी मिळायची. तसेच त्याला सामन्याच्या शेवटी विजयी संघाच्या कर्णधाराची सामन्यात वापरण्यात आलेल्या चेंडूवर स्वाक्षरी मिळायची. पण यावेळेस हे न दिसण्याची शक्यता अधिक आहे.

सामन्यादरम्यान खेळाडूंशी होणार नाही लाईव्ह चॅट –

आयपीएलच्या सामन्यादरम्यान समालोचक मायक्रोफनच्या द्वारे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एखाद्या खेळाडूशी चर्चा करताना दिसायचे. पण आता क्रिकेटचे सामना जैव-सुरक्षा वातावरणात खेळले जात आहे. त्यामध्ये अशा प्रकारे चर्चा करणे धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे खेळाडूंशी लाईव्ह चॅट यावेळी पहायला मिळू शकणार नाही.

तसेच यावेळी माईकचाही उपयोग होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कर्णधारही स्पाय कॅमेऱ्यावर त्यांचे विचार मांडताना दिसू शकतात.

हात मिळवण्यासाठी असेल बंदी – 

सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याबरोबरच खेळाडूंना सामन्याआधी आणि नंतर हस्तांदोलन करण्यास बंदी असेल. तसेच सामन्यादरम्यान विकेट गेल्यावरही खेळाडू एकमकांशी हात मिळवू शकणार नाहीत. स्पर्धेदरम्यान जैव-सुरक्षा वातावरण राखण्यासाठी खेळाडूंना हे करावे लागेल.

स्ट्रॅटजिक टाईम आऊटही होऊ शकते रद्द – 

आयपीएलदरम्यान एका सामन्यात ४ वेळा अडीच मिनिटांचा स्ट्रॅटजिक टाईम आऊट घेतला जातो. यादरम्यान संघ व्यवस्थापन सदस्य मैदानावर येऊन पुढील रणनीतीबद्दल चर्चा करताना दिसतात. पण सध्याची कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे सोशल डिस्टसिंग पाळायचे असल्याने हा टाईम आऊट रद्द केला जाऊ शकतो.


Previous Post

आयपीएलमध्ये एकही षटकार न मारु शकलेले ३ फलंदाज

Next Post

युएईत होत असलेल्या आयपीएलचा या ४ संघांना होणार मोठा फायदा

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

…म्हणून रिषभ पंतचे वडील आपल्या मुलाच्या छातीवर बांधायचे उशी

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“कृपया माझी तुलना धोनीसोबत करू नका”, रिषभ पंतने केली विनंती

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची विकेट खास, मोहम्मद सिराजने केला खुलासा

January 21, 2021
Photo Courtesy: MH File Photo
क्रिकेट

आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी श्रीसंत सज्ज; ‘हे’ तीन संघ लिलावात बोली लावण्याची शक्यता

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
क्रिकेट

“…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य  

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक

January 21, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

युएईत होत असलेल्या आयपीएलचा या ४ संघांना होणार मोठा फायदा

Photo Courtesy: Twitter/IPL & ChennaiIPL

चेन्नई सुपर किंग्जने भारतीय क्रिकेट संघाला दिले हे ४ अफलातून खेळाडू

Photo Courtesy: Twitter/ Delhicapitals & KKRiders & Lionsdenkxip

आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणारे ५ फलंदाज ....

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.