सध्या अफगाणिस्तान क्रिकेट टीम आयपीएलच्या आधी आयर्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. तर अफगाणिस्तान क्रिकेट टीमने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा धुव्वा उडवला आहे. तसेच अफगाणिस्तानने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. तर या सामन्यात मोहम्मद नबीने धमाकेदार कामगिरी केली आहे. तसेच या सामन्यात नबीने आधी 48 धावा केल्या. तर 5 विकेट्स घेतल्या आहेत.
यामुळे मुंबई इंडियन्सला गूड न्यूज मिळाली आहे. कारण मोहम्मद नबी यंदा आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. तसेच मोहम्मद नबीला मुंबई इंडियन्सने 1 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. तर नबीला 17 व्या हंगामाआधी लय सापडल्याने मुंबई इंडियन्सच्या संघात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.
याबरोबरच मुंबई इंडियन्सची टीम आपला पहिला सामना हा 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. या 17 व्या मोसमाआधी मुंबई इंडियन्स टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. मुंबईने ऑक्शनमधून एकूण 8 खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं. तर 11 खेळाडूंना करारमुक्त केलं. तर 15 खेळाडूंना कायम ठेवण्यात आलं. तसेच पलटणने 2 खेळाडूंना ट्रेड विंडोद्वारे आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
यापैकी अफगाणिस्तानचा ऑलराउंडर मोहम्मद नबी हा मुंबई इंडियन्स टीममधील वयस्कर खेळाडूंपैकी एक आहे. नबी 39 वर्षांचा आहे. नबीला मुंबईने ऑक्शनमधून 1 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. सनरायजर्स हैदराबादने नबीला 2023 नंतर करारमुक्त केलं होतं. नबीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 2 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स टीमचा समावेश आहे.
दरम्यान, आयपीएलचा 17वा हंगाम जवळ आला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच निवडणुकांमुळे 17 व्या हंगामातील फक्त पहिल्या 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान एकूण 3 डबल हेडरसह 21 सामने पार पडणार आहेत. त्याआधी एक एक करुन अनेक खेळाडू आपल्या टीमसोबत जोडले जात आहेत.
मुंबई इंडियन्सचा संघ- रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या , इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल आणि जेसन बेहरेनडोर्फ. रोमारियो शेफर्ड,गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज,नमन धीर.
महत्त्वाच्या बातम्या-