---Advertisement---

WPL 2024 : मुंबई इंडियन्स की आरसीबी! थेट फायनलचं तिकीट कोणाला मिळणार, वाचा सविस्तर

---Advertisement---

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात उपविजेता ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने बुधवारी येथे झालेल्या साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत गुजरात जायंट्‌स‌ संघावर सात विकेट व ४१ चेंडू राखून विजय मिळवला आणि यंदाच्या मोसमाची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आता एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्स- रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे संघ एकमेकांसमोर येणार आहेत. तर या लढतीतील विजेता संघ अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.

याआधी गुजरात जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण हा निर्णय चुकीचा ठरला. गुजरातला 20 षटकात 9 गडी गमवून 126 धावा करता आल्या. गुजरातने दिल्लीसमोर विजयासाठी 127 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दिल्लीने 3 गडी गमवून 14 व्या षटकात पूर्ण केलं. शफाली वर्माच्या झंझावाती अर्धशतकामुळे दिल्लीचा विजय सोपा झाला आहे.

याबरोबरच 15 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. तसेच WPL 2024 ची सुरुवात आणि शेवट गुजरात जायंट्सच्या पराभवाने झाली आहे. तर गुजरात जायंट्सचा संघ 8 पैकी फक्त 2 सामने जिंकू शकला आहे. तर  तर दिल्ली कॅपिटल्सने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. यामुळे दिल्ली कॅपिटल्सने WPL 2024 मध्ये अंतिम फेरी गाठली आहे.

दरम्यान, वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात दिल्लीने अंतिम फेरी गाठली आहे. साखळी फेरीत अव्वल स्थान कायम ठेवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. साखळी फेरीतल्या शेवटच्या सामन्यात गुजरातचा 8 गडी राखून पराभव केला. आता दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यापैकी एका विजेत्याशी होईल.

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), दयालन हेमलथा, फोबी लिचफील्ड, ॲशले गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, शबनम मो. शकील, मेघना सिंग, मन्नत कश्यप.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---