भारतीय संघाचा स्टार खेळाडू आयपीएल 2024 पूर्वी या लीगमध्ये सरफराज खान खेळणार असल्याची बरीच चर्चा आहे. तो पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता आणि त्याआधी तो आरसीबीकडूनही खेळला होता. पण आयपीएल 17 च्या लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. आता तो आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये खेळू शकेल का, असा प्रश्न अनेक दिवसांपासून सुरू आहे.याबरोबरच उंचीनं थोडा कमी असलेल्या सरफराज खानच्या धुवादार खेळीची त्यावेळी खूप चर्चा झाली. आयपीएलसारख्या मोठ्या व्यासपीठावर सरफराजनं त्याचं कौशल्य देखील दाखवलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं धावांचा रतीब घातला आहे. पण 2024 च्या लिलावात हाच सरफराज अनसोल्ड राहिला आहे.
अशातच सरफराज खानला आयपीएलमध्ये खेळण्याची पुन्हां संधी मिळू शकते. कारण दिल्ली कॅपिटल्सचा एक खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर झाला असून त्याच्या जागी सरफराज खानची संघात निवड केली जाऊ शकते. याबरोबरच राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सर्फराजला खेळण्याची संधी मिळाली होता. पदार्पणाच्या कसोटीतच सर्फराजने दोन्ही डावात अर्धशतके झळकावून चमकदार कामगिरी केली होती. विशेष म्हणजे तो आयपीएल 2024 च्या लिलावात 20 लाख बेस प्राईस असूनही अनसोल्ड राहिला होता.दरम्यान, सरफराजची बेस प्राईज 20 लाख रुपये होती. तसेच गेल्या वर्षी तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. 2022 मध्ये झालेल्या लिलावातही त्याची बेस प्राईज 20 लाख होती. त्याच किमतीला दिल्लीनं त्याला खरेदी केलं होतं.गेल्या वर्षी रिटेन केलं. पण हंगामात त्याला केवळ 4 वेळा संधी मिळाली. त्यात त्यानं 53 धावा केल्या. सर्वोत्तम धावा 30 होत्या. सरफराज आयपीएलमध्ये 50 सामने खेळला आहे. त्यात त्यानं 22.50 च्या सरासरीनं 585 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 130.58 इतका राहिला आहे. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. याबरोबरच, इंडियन प्रीमियर लीग 22 मार्चपासून सुरू होत आहे.
दरम्यान याआधीही अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून अचानक माघार घेतली आहे. यामध्ये इंग्लंडचेच ॲलेक्स हेल्स आणि जेसन रॉय यांचा समावेश होतो. मिचेल स्टार्क सारख्या खेळाडूंनीही अशीच कारणं सांगून यापूर्वी आपली नावे मागे घेतली आहेत. आता ब्रूकनं दिल्ली कॅपिटल्स संघातून माघार घेतल्यानं त्याच्या बदली खेळाडूचा शोध सुरू आहे.