---Advertisement---

प्रमोशन फेरीत रत्नागिरी संघाचा पहिला विजय

On: गुरूवार, मार्च 21, 2024 11:08 PM
---Advertisement---

पुणे (21 मार्च 2024) – आजचा चौथा सामना रत्नागिरी विरुद्ध नंदुरबार यांच्यात झाला. रत्नागिरी संघ प्रमोशन फेरीत आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत होता तर नंदुरबार संघाने 2 पैकी 1 सामना जिंकला होता. रत्नागिरी संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत सामन्यात आघाडी मिळवली. अभिषेक शिंदेच्या आक्रमक चढायांनी रत्नागिरी संघाने नंदुरबार संघाला सातव्या मिनिटाला ऑल आऊट करत 10-01 अशी आघाडी मिळवली.

रत्नागिरी संघाने आपला आक्रमक प्रवित्रा कायम ठेवत मध्यंतरा पूर्वी नंदुरबार संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत मध्यंतराला 23-08 अशी निर्यायक आघाडी मिळवली. रत्नागिरीच्या वेद पाटील, आविष्कार पालकर व निलेश शिंदे यांनी उत्कृष्ट पकडी करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. मध्यंतरा नंतर खेळ थोडा संथ झाला होता. अभिषेक शिंदे ने सुपर टेन पूर्ण करत संघाला चांगली आघाडी मिळवून दिली.

रत्नागिरी संघाने नंदुरबार संघावर 40-29 असा विजय मिळवत प्रमोशन फेरीत विजयाचा खात उघडला. रत्नागिरी कडून अभिषेक शिंदे ने सर्वाधिक 13 गुण मिळवले. निलेश शिंदे ने पकडीत एकूण 6 गुण मिळवले. आविष्कार पालकर ने पकडीत 4 तर साईप्रसाद पाटील ने 3 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. नंदुरबार कडून वरून खंडले ने 8 गुण मिळवले. श्रेयस उमरदंड ने पकडीत एकूण 4 गुण मिळवले.

बेस्ट रेडर- अभिषेक शिंदे, रत्नागिरी
बेस्ट डिफेंडर- निलेश शिंदे, रत्नागिरी
कबड्डी का कमाल – अभिषेक शिंदे, रत्नागिरी

महत्वाच्या बातम्या – 
प्रमोशन फेरीत अहमदनगर, पालघर व कोल्हापूर संघांचा सलग दुसरा विजय
प्रमोशन फेरीत कोल्हापूरचा दुसरा विजय, तर मुंबई शहरचा दुसरा पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---