---Advertisement---

प्रमोशन फेरीत अहमदनगर व कोल्हापूर संघाची विजयाची हट्रिक

---Advertisement---

पुणे (21 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये प्रमोशन फेरीचे सामने सुरू आहेत. प्रमोशन फेरीत आज अहमदनगर, कोल्हापूर, सांगली व नंदुरबार संघानी विजय मिळवला. अहमदनगर व कोल्हापूर संघानी सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. तर मुंबई शहर व बीड संघ तिसऱ्या दिवशीही विजय मिळवू शकले नाहीत.

आज झालेल्या पहिल्या लढतीत कोल्हापूर संघाने 28-22 असा पालघर संघावर विजय मिळवत प्रमोशन फेरीत सलग तिसरा विजय मिळवला. कोल्हापूर संघाकडून सांघिक खेळ बघायला मिळाला. कोल्हापूरच्या चढाईटपटूंनी 9 तर पकडपटूंनी 11 गुण मिळवले. तर कोल्हापूर ने ऑल आऊट चे 4 व अतिरिक्त 4 महत्वपूर्ण गुण मिळवले. पालघर कडून बचावपटूंनी 5 सुपर टॅकल करत सामना चुरशीचा केला होता. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात सांगली ने बीड संघावर 42-35 असा विजय मिळवला. सांगलीच्या अभिराज पवार व अभिषेक गुंगे यांच्या सुपर टेन खेळीने सांगलीने दुसरा विजय मिळवला. बीड कडून शंकर मेघाने उत्कृष्ट खेळ करत 13 गुणांची खेळी केली. तर शशिकांत दास ने पकडीत 5 गुण मिळवले.

अहमदनगर संघाने मुंबई शहरवर 44-21 अशी एकतर्फी मात देत प्रमोशन फेरीत सलग तिसरा विजय मिळवला. अहमदनगरच्या आशिष यादव ने 17 गुणांची अष्टपैलू खेळी केली. अभिषेक मापारी ने पकडीत 6 गुण मिळवले. मुंबई शहर कडून जतिन विंदे चढाईत 11 गुण मिळवले. आजच्या चौथ्या सामान्यात रत्नागिरी संघाने नंदुरबारवर 40-29 असा विजय मिळवला. रत्नागिरी कडून अभिषेक शिंदे ने 13 गुण मिळवले तर निलेश शिंदे ने पकडीत एकूण 6 गुण मिळवले. (Ahmednagar and Kolhapur team won a hat trick in the promotion round)

प्रमोशन फेरी गुणतालिका.
1. अहमदनगर – 18 गुण (3 सामने)
2. कोल्हापूर – 16 गुण (3 सामने)
3. पालघर – 13 गुण (3 सामने)
4. सांगली – 11 गुण (3 सामने)
5. रत्नागिरी – 7 गुण (3 सामने)
6. नंदुरबार – 6 गुण (3 सामने)
7. बीड – 1 गुण (3 सामने)
8. मुंबई शहर – 0 गुण (3 सामने)

महत्वाच्या बातम्या – 
प्रमोशन फेरीत सांगलीचा दुसरा विजय, तर बीड संघाचा तिसरा पराभव
प्रमोशन फेरीत रत्नागिरी संघाचा पहिला विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---