94 वर्षापासून ‘या’ खेळाडूचं रेकाॅर्ड कायम! दिग्गज खेळाडू त्याच्या जवळपासही नाहीत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकाॅर्ड तुटतात तर अनेक नवीन बनतात. पण क्रिकेटमध्ये असे अनेक रेकाॅर्ड आहेत, जे मोडीत काढणं अवघडच नाही तर अशक्य आहे. या बातमीद्वारे आज आपण एका अशा रेकाॅर्डबद्दल जाणून घेणार आहोत. त्या रेकाॅर्डला आजपर्यंत दिग्गज फलंदाजही मोडू शकले नाहीत. हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा रेकाॅर्ड आहे. इंग्लंडचा माजी अष्टपैलू विल्फ्रेड रोड्सच्या (Wilfred Rhodes) नावावर हा विश्वविक्रम आहे, जो 94 वर्षांपासून कायम आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम विल्फ्रेड रोड्सच्या (Wilfred Rhodes) नावावर आहे. या माजी इंग्लंड अष्टपैलू खेळाडूनं 1898 ते 1930 दरम्यान 1,110 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेलं नाही. इतर कोणत्याही क्रिकेटपटूला आतापर्यंत 1,000 प्रथम श्रेणी सामने खेळता आलेले नाहीत. सचिन तेंडुलकर सारखा महान क्रिकेटपटू देखील या विश्वविक्रमाच्या जवळ जाऊ शकला नाही.
विल्फ्रेड रोड्सनं (Wilfred Rhodes) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 16.72च्या सरासरीनं 4,204 विकेट्स घेतल्या आहेत. 4000 विकेट्सचा टप्पा पार करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. त्यानं केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजीतही वर्चस्व निर्माण केलं होतं. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 30.81च्या सरासरीने 39,969 धावा ठोकल्या. त्यामध्ये 58 शतकांचा समावेश आहे.
विल्फ्रेड रोड्सचं (Wilfred Rhodes) 1973 मध्ये वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. या दिग्गज खेळाडूनं इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळलं आहे. विल्फ्रेड रोड्सनं केवळ कसोटी फॉरमॅट खेळला आणि त्याच्या कारकिर्दीत त्यानं 30.19च्या सरासरीनं 2,325 धावा केल्या. त्याच्या नावावर कसोटीमध्ये 127 विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मेगा लिलावापूर्वी हैदराबादचा प्लॅन ठरला, 150चा स्पीड असणाऱ्या वेगवान गोलंदाजाला बसणार मोठा झटका!
भारतासोबत टी20 मालिका नाही; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पीसीबीची स्थिती बिकट! आयसीसीला आवाहन
‘किंग’ कोहलीनं क्रिकेटवर गाजवलंय वर्चस्व..! पण त्याची दहावीची मार्कशीट पाहून बसेल धक्का