---Advertisement---

कोरोनाच्या काळात या दिग्गज क्रिकेटरच्या घरात आली खुशखबरी, पहिल्यांदाच झाला तो बाप

On: सोमवार, जुलै 27, 2020 12:04 PM
---Advertisement---

मुंबई । ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा पहिल्यांदाच वडील झाला आहे. त्याची पत्नी रेचल हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ख्वाजाने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना याबद्दल सांगितले.

या फोटोत ख्वाजा आणि त्याची बायको मुलीला धरून बसली आहे. फोटोत मुलगी गोड स्मित हास्त करताना दिसत आहे. या मुलीचे नाव आयशा असे ठेवले असून तिचा जन्म 21 जुलै 2020  रोजी झाला.

ख्वाजाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”अलहमदुल्लाह, माझी पहिली मुलगी आयशाच्या आगमनामुळे खूप आनंद झाला. वडिलांप्रमाणेच तिलाही थंडी आवडत नाही.”

https://www.instagram.com/p/CDBBY0SFdcS/

ख्वाजाची पत्नी रेचल हिने एक फोटो शेअर करत लिहिले की, “21 जुलै रोजी जन्मलेली आयशा राहिल ख्वाजा. सध्या तिचे वजन 3.27 किलो आहे. आम्ही बाळावर खूप प्रेम करत आहोत. आपल्या मुलीस पहिल्यांदा भेटण्याचा आनंद वेगळा आहे, जो आपण नेहमी लक्षात ठेवू.”

https://www.instagram.com/p/CDBBI1YMm9c/

ख्वाजाने 44 कसोटी सामने आणि 40 वनडे सामने खेळले आहेत. डाव्या हाताने फलंदाजी करणारा या खेळाडूंने  2887 धावा केल्या आहेत आणि वनडे सामन्यात 1554 धावा आहेत. ख्वाजा हा मूळचा पाकिस्तानचा असून तो ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळतो.

महत्त्वाच्या बातम्या-

५ वर्षाचा सुखाचा संसार मोडला, जगातील टॉप ऑलराऊंडरने मांडली वेगळी चुल

मुंबई इंडियन्स आहे आयपीएल विजेतेपदाचा दुसरा प्रबळ दावेदार, तर या संघाला आहे सर्वाधिक संधी

१९८३ विश्वविजेत्या भारतापेक्षा पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाले होते २६पट जास्त पैसे, रमीज राजाने शेअर केला फोटो

ट्रेंडिंग लेख-

क्रिकेट वेडापायी वसईचा पाटील खेळला युएईकडून; कर्णधार होऊन केले भारताविरुद्धच दोन हात, वाचा संपुर्ण स्टोरी

टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ४- शैलीच्या विपरीत खेळत डिविलीयर्सने २२० चेंडूत ३३ धावा केल्या, परंतू क्रिकेटरसिकांच्या हृदयात…

झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---